सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुलीच्या कारला भरधाव बसने धडक दिली. Pudhari Photo
राष्ट्रीय

सौरभ गांगुलीची मुलगी अपघात बालंबाल बचावली; बसची कारला धडक

Kolkata Accident News | Sourav Ganguly | बस चालकाला अटक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाइन डेस्क: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) मुलगी सना गांगुलीच्या (Sana Ganguly) कारला भरधाव असलेल्या बसने धडक दिली. कोलकाता येथील डायमंड हार्बर रोडवरील बेहाला चौरस्ताजवळ शुक्रवारी (दि.३) सायंकाळी हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (Kolkata Accident News)

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बस चालकाच्या बाजूने कारला धडकली, यादरम्यान सना कारच्या पुढील सीटवर बसली होती. धडकेनंतर कार पलटी होणार होती, मात्र सतर्क चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात सनाला कोणतीही दुखापत झाली नसली तरी कारच्या काचा पूर्णपणे तुटल्या आहेत. या अपघाताबाबत गांगुली कुटुंबीयांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे. बसही जप्त करण्यात आली आहे.

अपघातानंतर, बस भरधाव निघून गेली. परंतु, सना गांगुलीच्या कारच्या चालकाने पाठलाग करून साखर बाजारजवळ बस थांबवली. सना गांगुलीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस चालकाला ताब्यात घेतले.

कोण आहे सना गांगुली?

सना गांगुलीने कोलकात्याच्या लोरेटो हाऊसमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. सध्या, ती लंडनस्थित बुटीक सल्लागार फर्म INNOVERV मध्ये सल्लागार म्हणून काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT