Kolkata Rape-Murder Case : रिचा चढ्ढा म्हणाली, "बलात्काऱ्यांना हार..."  Pudhari News
राष्ट्रीय

Kolkata Rape-Murder Case : रिचा चढ्ढा म्हणाली, "बलात्काऱ्यांना हार..."

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकातामधील (Kolkata Rape-Murder Case) सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात शुक्रवारी, ९ ऑगस्‍ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे "आपण अशा देशात राहतो जिथे बलात्कार करणाऱ्याला शिक्षा होण्यापेक्षा पीडितेला दोषी ठरवण्याला प्राधान्य दिले जाते?"

काय म्हणाली रिचा चढ्ढा?

  • आपण अशा देशात राहतो जिथे पीडितेला दोषी ठरवण्याला प्राधान्य दिले जाते

  • दोषी ठरलेल्या बलात्काऱ्यांना हार घालून तुरुंगातून सोडवले जाते

  • छेडछाड करणारे, हल्लेखोर, बलात्कारी या सर्वांचा चेहरा काळवंडून टाका

  • ममताजी आम्ही तुम्हाला पाहत आहोत

आपण अशा देशात राहतो...

कोलकाता बलात्कार-खून प्रकरणानंतर (Kolkata Rape-Murder Case) बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे, "एका महिलेला ३६ तास कामावर गेल्यानंतर तिच्या कामाच्या ठिकाणी बलात्कार करून तिची हत्या केली जाते. २०१२ आणि २०२४ नंतर काय बदलले आहे? असा सवाल उपस्थित करत रिचा चढ्ढा पुढे लिहते की, "आपण अशा देशात राहतो जिथे बलात्कार करणाऱ्याला शिक्षा होण्यापेक्षा पीडितेला दोषी ठरवण्याला प्राधान्य दिले जाते. जिथे दोषी ठरलेल्या बलात्काऱ्यांना हार घालून तुरुंगातून सोडले जाते आणि 'निवडणुकांवर डोळा ठेवून', (मतदारांबद्दल काय म्हणते?) अनेकदा मिरवणुका काढल्या जातात.

लैंगिक छळ कायदेशीर आहे...

रिचा चढ्ढा पुढे लिहते की, "बलात्काऱ्यांच्या रक्षणार्थ (राजकीय सोयीनुसार) जिथे ऑलिम्पियनला नियमांची आठवण करून दिली जाते, जसे काही लैंगिक छळ कायदेशीर आहे. आपला समाज असा आहे की, जिथे महिला पदावर विराजमान आहेत, ‘महिला आयोग’ गुन्हेगाराचे त्यांच्याशी राजकीय संबंध असल्यास गप्प राहतात. ज्युनियर डॉक्टर धैर्याने निषेध करत आहेत हे चांगले आहे! हे सर्वजन समाजाचे उपकार करत आहेत!"

त्यांचा चेहरा काळा करा, ओळख उघड करा आणि...

पुढे लिहताना रिचा चढ्ढा लिहते, "सर्व छेडछाड करणारे, हल्लेखोर, बलात्कार करणाऱ्यांना जबाबदार धरा. त्यांचा चेहरा काळा करुन टाका, त्यांची ओळख उघड करा, त्यांचा रासायनिक पद्धतीने नाश करा, या धोक्याचा अंत करण्यासाठी काय-काय करायची गरज आहे ते करा! हा मॉं कालीचा देश आहे, आपण महिलांनी तिचे आवाहन केले पाहिजे. अशा लैंगिक गुन्ह्यांसाठी नरक द्यावा.

ममताजी आम्ही तुम्हाला पाहत आहोत

रिचा चढ्ढा (Kolkata Rape-Murder Case) हिने आणखी एक ट्वीट करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी यांना टॅग करत म्हटलं आहे, "ममताजी, या देशातील महिलांना तुमच्याकडून निष्पक्ष आणि निष्पक्ष तपासाची अपेक्षा आहे आणि जलद न्याय हवा आहे. सध्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारी तुम्ही एकमेव महिला आहात.आम्ही तुम्हाला पाहत आहोत." असं लिहित तिने हॅशटॅग #JusticeForMoumita दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT