कोलकाता प्रशिणार्थी डॉक्‍टर बलात्‍कार-हत्‍या प्रकरणातील आरोपी संजय रॉय. File Photo
राष्ट्रीय

चोराच्या उलट्या बोंबा! आराेपी संजय रॉय 'पॉलीग्राफ'वेळी म्‍हणाला,"हॉस्‍पिटलमधील..."

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "मी हॉस्‍पिटलमधील महिला डॉक्‍टरचा मृतदेह पाहून घटनास्‍थळांवरुन पळून गेलो, माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही," असा दावा कोलकाता प्रशिणार्थी डॉक्‍टर बलात्‍कार-हत्‍या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने पॉलीग्राफ चाचणीवेळी केला असल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. दरम्‍यान, पॉलीग्राफ चाचणी अहवाल हा न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र या चाचणीवेळी संजय रॉय याने दिलेल्‍या माहिती सीबीआयला तपासासाठी पूरक नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

मला प्रकरणामध्‍ये गोवले गेले : संजय रॉयचा दावा

कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी १० ऑगस्‍ट रोजी संजय रॉय याला अटक केली होती. यावेळी त्‍याने गुन्ह्याची कबुली दिली होती. 25 ऑगस्ट रोजी कोलकाता प्रेसिडेन्सी सेंट्रल जेलमध्ये त्‍याची पॉलीग्राफ चाचणी करण्‍यात आली होती. पॉलीग्राफ टेस्‍टवेळी यू-टर्न घेत मी निर्दोष असून, मला या प्रकरणामध्‍ये गोवले गेल्‍याचा दावा त्‍याने केला आहे.

सीबीआयने विचारले १० प्रश्‍न

रॉय याला पॉलीग्राफ चाचणीदरम्यान सीबीआयने दहा प्रश्न विचारले होते. चाचणीवेळी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यासह तीन पॉलीग्राफ तज्ज्ञ उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार-हत्येच्या आरोपीने दावा केला की,हॉस्‍पिटलमधील सेमिनार हॉलमध्‍ये गेलो तेव्‍हा पीडिता मृत अवस्‍थेत पडली होती. तिचा मृतदेह पाहून मी सेमिनार हॉलमधून पळ काढला. पोलीग्रॉफ चाचणीत त्‍याने अनेक खोटी आणि खात्री न पटणारी उत्तरे दिल्‍याचेही सूत्रांनी म्‍हटलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉयला हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये जाताना दिसला होता. याच ठिकाणी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. विशेष म्‍हणजे मृतदेहाजवळ रॉय याचे ब्लूटूथही सापडले होते. दरम्‍यान, सीबीआय आतापर्यंत निर्णायक पुरावे सादर करू शकले नाही. त्यांना तपास करू द्या आणि गुन्हा सिद्ध करू द्या," असे संजय रॉय याचे वकील कविता सरकार यांनी म्‍हटले आहे. त्‍यामुळे आता सीबीआय न्‍यायालयात कोणते पुरावे सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT