आजपासून देशभरात निवासी डॉक्टरांचा संप  Pudhari
राष्ट्रीय

Kolkata doctor rape case : आजपासून देशभरात निवासी डॉक्टरांचा संप

ओपीडी सेवा ठप्प

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकातामधील सरकारी हॉस्‍पिटलमध्‍ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महिलेवर झालेला बलात्‍कार आणि निर्घृण हत्‍येने संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज (दि.१३) देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यातील डॉक्टरांच्या संघटनानी देखील पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी हॉस्‍टोटलमधील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्‍यात आली आहे( Kolkata doctor rape case )

डॉक्टरांकडून ६ मागण्या

कोलकातामधील सरकारी हॉस्‍पिटलमध्‍ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महिलेवर बलात्‍कार करत निर्घृण हत्‍या केली. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज (दि.१३) देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.सध्या डॉक्टरांकडून ६ मागण्या केल्या जात आहेत. त्या पुढीलप्रमाणे.

  • न्यायिक चौकशीची मागणी

  • तपासात पारदर्शकता आणण्याची मागणी

  • जो कोणी जबाबदार असेल त्याने राजीनामा द्यावा

  • विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याबद्दल पोलिसांनी माफी मागावी

  • पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी

  • बंगालच्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कडक सुरक्षा करावी

नराधम संजय रॉयने केला पुरावा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न

अधिक तपासात असे दिसून आले की, गुन्हा केल्यानंतर रॉयने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने घटनास्थळावरून रक्ताचे डाग धुवण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांना आढळले आहे. पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे ४:४५ वाजता रॉय सेमिनार रूममधून बाहेर पडताना दिसत आहेत. रॉय हॉस्‍पिटलच्‍या दुसर्‍या खोलीत जावून झोपला होता. येथे त्‍याला पोलिसांनी अटक केली तेव्‍हाही तो दारूच्या नशेत होता.रॉय यांना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्यावर बीएनएसच्या कलम 64 (बलात्कार) आणि 103 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून प्रकरणात इअरफोनचा पुरावा

आरोपी संजय रॉय याचा इअरफोन घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही आरोपी संजय हा पहाटे ४ वाजता सेमिनार हॉलमध्ये जाताना दिसत आहे. जाताना त्याच्या कानात इअरफोन दिसत आहे, परततानाच्या दृश्यात मात्र इअरफोन दिसत नाही. मोबाईल आणि इअरफोनची क्रॉस चेकिंग केली असता फक्त संजयच्या मोबाईलला घटनास्थळी आढळून आलेला इअरफोन काही वेळापूर्वी कनेक्ट होता, असेही स्पष्ट झाले आहे. चौकशीत संजयने स्वतः बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिलेली आहे. एवढे पुरावे त्याला कठोर शिक्षेसाठी पुरेसे असल्याचे कायद्याच्या जाणकारांतून सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT