राष्ट्रीय

Kerala train arson case : कट्टरपंथी व्हिडीओ पाहून शाहरूखने घडविले हत्याकांड

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केरळ ट्रेन जाळपोळ प्रकरणातील एकमेव आरोपी शाहरूख सैफी (वय २७) याच्याविरुद्ध एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आरोपपत्र तयार केले असून, त्यानुसार, इस्लामी कट्टरपंथाचा प्रचार करणारे व्हिडीओ पाहून शाहरूख जिहादी बनला, असे एनआयएने स्पष्ट केले आहे.

एप्रिलमध्ये शाहरूख सैफीने घडविलेल्या या घटनेत एका मुलासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते..
शाहरूख सैफीवर भादंवि, यूएपीए, रेल्वे कायदा आणि पीडीपीपी कायद्यांच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. शाहरूखने २ एप्रिल रोजी अलप्पुझा – कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या डी १ कोचला आग लावली होती आणि प्रवाशांवर पेट्रोल फेकले होते. सैफी दहशतवादी कृत्यासाठीच केरळला गेला होता. आपल्याला कुणी ओळखत नाही, अशा ठिकाणी त्याला जिहाद करायचा होता.

SCROLL FOR NEXT