Amoeba infection death in kerala
धक्कादायक | केरळमध्ये दुर्मिळ अमीबा संसर्गामुळे १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू File Photo
राष्ट्रीय

Amoeba infection | पोहताना डोक्यात शिरकाव, मेंदू खाणाऱ्या अमीबाने घेतला युवकाचा बळी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: केरळमध्ये दुर्मिळ अमीबा (अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस) संसर्गामुळे १४ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केरळमधील कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त 'NDTV' ने दिली आहे.

केरळच्या आरोग्य विभागाने गुरूवारी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, दूषित पाण्यात आढळलेल्या मुक्त-जिवंत अमीबामुळे १४ वर्षीच्या 'मृदुल'चा मृत्यू झाला. बुधवारी (दि.३ जुलै) रात्री ११ वाजून २० मिनिटांनी खासगी रुग्णालयात या मुलावर मृत्यू ओडावला. संबंधित मृत्यू झालेला मुलगा एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला असता, त्याला हा संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

मे, २०२४ पासून अमीबा संसर्गाने मृत्यू झाल्याची तिसरी घटना

मे, २०२४ पासून दक्षिणेकडील राज्यातील ही अशाप्रकारे प्राणघातक संसर्गाची ही तिसरी घटना आहे. पहिली घटना २१ मे रोजी मलप्पुरममध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू आणि दुसरी घटना म्हणजे २५ जून रोजी कन्नूरमध्ये १३ वर्षीय मुलीचा अशाचप्रकारे दुर्मिळ अमीबा संसर्गामुळे मृत्यू झाला होता.

यापूर्वी २०१७, २०२३ मध्येही संसर्गाच्या घटना

वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, मुक्त जिवंत नॉन-परजीवी अमिबा बॅक्टेरिया दूषित पाण्यातून शरीरात प्रवेश करतात तेव्हा हा संसर्ग होतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात नागरिकांना 'अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस'बाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी 2017 आणि 2023 मध्ये केरळच्या किनाऱ्यावरील अलाप्पुझा जिल्ह्यात हा संसर्गजन्य आजार दिसून आला होता.

SCROLL FOR NEXT