kerala dalit medical student death pudhari
राष्ट्रीय

kerala dalit medical student death: केरळमध्ये २२ वर्षाच्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू... शिक्षकांनी जातीवरून अपमान केल्याचा आरोप

caste based discrimination in college :'सुशिक्षित' केरळमधील धक्कादायक घटना

Anirudha Sankpal

kerala dalit medical student death: केरळम सारख्या सुशिक्षित राज्यात एका २२ वर्षाच्या मेडिकल शाखेत शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. महाविद्यालयातील शिक्षकांनी त्याच्या जातीवरून, रंगावरून आणि त्याचे आई वडील रोजंदारीवर काम करतात म्हणून अपमान केल्याचा आरोप होत आहे.

थिरूवअनंतपुरममधील उझहामलाक्कल गावात राहणाऱ्या नितीन राजा आर.एल. चा शुक्रवारी कन्नूर डेंटल कॉलेज कॅम्पमध्ये इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या बीडीएस च्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या नितीनला लगेचच मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल केलं. मात्र गंभीर जखम झाल्यानं त्याचा मृत्यू झाला.

एसी/एसटी अॅक्ट लागू

कुटुंबीयांनी नितीच्या मृत्यूप्रकरणी काहीतरी चुकीचं झालं असल्याचा आरोप केला आहे. कन्नूर पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र रविवारी त्यांनी बीएनएस कलम १०८ अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर एस एसटी अॅक्ट अंतर्गत देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कॉलेजमधील दोन शिक्षकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

लोन अॅपच्या एजंटवरीही ठपका

दरम्यान, कन्नूर एसीपींच्या अध्यक्षतेखालील एक विशेष तपास पथक देखील तयार करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की नितीने एका ऑनलाईन अॅपमार्फत कर्ज घेतलं होतं. या कर्जपरतफेड प्रकरणी एजंट त्याला फोनवरून धमकी देत होते. पोलिसांनी असं देखील सांगितलं की तो एजंट हा कॉलेजमधील फॅकल्टी मेंबरच्या संपर्कात देखील होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अजून एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लोन अॅपचा एजंटवर दाखल करण्यात आला आहे.

मॅनेजमेंट ऑफ सेल्फ फायनान्सिंग कॉलेजने देखील याची दखल घेतली असून मॅनेजमेंटने विभाग प्रमुख आणि असोसिएट प्रोफेसर यांना विद्यार्थाचे जातीवरून अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी या आरोपांची चौकशी करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

ऑडिओ क्लिक आली बाहेर

जातीवरून अपमान केल्याचा नितीन दावा करत असलेली एक ऑडिओ क्लिक समोर आली. त्यात शिक्षकांनी जातीवरून अपमान आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये नितीन दावा करतो की, 'ते माझा सर्वांसमोर अपमान करतात. मी खूप सहन केलं आहे. माझी उत्तरपत्रिका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. माझे स्पेलिंग मिस्टेक सर्वांना दाखवण्यात आल्या.'

नितीन पुढे दावा करतो की, 'परवा मी त्यांच्या क्लासमध्ये बसलो असताना त्यांनी माझ्या आईची देखील खिल्ली उडवली. स्टाफ रूममधून बाहेर आल्यानंतर त्यांनी मला इडियट म्हटलं. मी त्यांना सेम टू यू असे प्रत्युत्तर दिलं. स्टाफ रूम ही अशी जागा आहे तिथं सर्वजण मिळून तुमच्यावर हल्ला करतात. जर मी ही गोष्ट बाहेर सांगितली तर तुझे हात आणि पाय तोडून टाकू अशी धमकी देकील दिली. मी त्यांना असं करण्याचं आव्हान दिलं.'

नितीनच्या बहिणाचा दावा

नितीनची बहीण निकिताने सांगितलं की, माझ्या भावाचा त्याच्या दिसण्यावरून आणि रंग, जात आणि आई वडिलांच्या कामावरून सतत अपमान केला जात होता. निकिता सांगते की, 'माझ्या भावाने मला सांगितलं होतं की त्याचे विभाग प्रमुख त्याला मॅड डॉग म्हणून बोलवायचे. ते वर्गात त्याचा अपमान करायचे. नितीनचा सर्वांसमोर अपमान होत असताना इतर विद्यार्थी त्याच्यावर हसायचे. इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.' नितीनने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सेल्फ फायनासिंग डेंटल कॉलेजला प्रवेश घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT