माजी मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, दिल्लीने असा निवडणूक प्रचार कधीच पाहिला नाही: केजरीवाल file photo
राष्ट्रीय

माजी मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, दिल्लीने असा निवडणूक प्रचार कधीच पाहिला नाही: केजरीवाल

Arvind Kejriwal: भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा 'आप'चा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्र्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, असा निवडणूक प्रचार दिल्लीने कधीच पाहिला नाही, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. ते म्हणाले की, माझे जीवन देशासाठी समर्पित आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांनी शनिवारी, मतदारसंघात प्रचारादरम्यान केजरीवालांवर हल्ला केल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील लोकांनी असा प्रचार आणि हिंसाचार कधीही पाहिला नाही ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा त्यांचा प्रचार करण्याचा मार्ग आहे कारण ते पराभूत होत आहेत, असे केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.

केंद्राने जमीन द्यावी, दिल्ली सरकार स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधेल

केजरीवाल यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी योजनेबद्दल पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये केंद्राने जमीन उपलब्ध करून दिल्यास दिल्ली सरकार घरे बांधेल असा प्रस्ताव आहे. त्यांनी सांगितले की, ही योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरू करता येईल आणि नंतर इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सुलभ अटींवर घरे देता येतील.

'आप' बनावट कथा रचत आहे: प्रवेश वर्मा

भाजपचे नवी दिल्ली विधानसभेचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी रविवारी हल्ल्याबाबत 'आप'वर बनावट कथा रचल्याचा आरोप केला. तर 'आप'चे संयोजक केजरीवाल २०,००० मतांनी पराभूत होतील असा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT