अरविंद केजरीवाल यांनी आप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्‍याची घोषणा केली.  (Image source- X)
राष्ट्रीय

दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्‍यांची नावे आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "मी दोन दिवसांनी दिल्‍लीच्‍या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे", अशी घोषणा करत अरविंद केजरीवाल पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. त्‍यांच्‍या या घोषणेनंतर आता दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा आपच्‍या वर्तुळात रंगली आहे.

माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील

'मी दोन दिवसांनी दिल्‍लीच्‍या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी आणि मनीष सिसोदिया जनतेमध्ये जाऊ, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी आज केली. दिल्ली विधानसभा विसर्जित होणार नाही. माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. आप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.

माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील : केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. ते म्हणाले की, मी आणि मनीष सिसोदिया जनतेमध्ये जाऊ. दिल्ली विधानसभा विसर्जित होणार नाही. माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील. पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री?

दिल्‍ली मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत आतिशी यांचे नाव आघाडीवर आहे. त्‍या कालकाजी मतदारसंघाच्‍या आमदार आहेत. सध्‍या त्‍यांच्‍याकडे शिक्षण, उच्च शिक्षण, वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधाकाम, पाणी, वीज, सेवा, दक्षता, जनसंपर्क आदी खाती आहेत. आतिशीसोबत सौरभ भारद्वाजचेही नाव आघाडीवर आहे. ते दिल्लीतील ग्रेटर कैलास मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्‍या ते आपच्‍या सरकारमध्‍ये आरोग्य, शहरी विकास आणि पर्यटन मंत्री आहेत. सौरभ हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांचेही नाव चर्चेत आहे. कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. या यादीत आपचे आमदार कुलदीप कुलदीप कुमार यांचेही नाव आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याही नावाची चर्चा आहे. आमदारांची बैठक होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे आता या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT