बेंगळूरू : बेंगळुरूमधील परप्पान अग्रहार तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी सुविधा आणि मोबाईल फोनमुळे नेहमी चर्चेत असते. आता या तुरुंगात चक्क दहशतवादी कैद्याच्या हातात मोबाईल व ऐशआरामी सुविधा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे.
बलात्कार प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार उमेश रेड्डी व गोल्ड स्मगलर तरण राज मोबाईल फोन वापरताना आणि टीव्ही पाहताना कॅमेऱ्यात कैद झाला, तर लष्करच्या एका दहशतवाद्याचा मोबाईल फोन वापरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
आयसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जुहाद हमीद शकील मन्नालाही परप्पाना अग्रहारा तुरुंगात राजघराण्यासारखे वागवले जात असल्याचे उघड झाले आहे. तो आयसिस दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी तरुणांची भरती करत होता. परप्पाना अग्रहारा तुरुंगात त्याला स्मार्ट फोनचा आशीर्वाद मिळाला आहे. तो तुरुंगात राजेशाही पद्धतीने फोन वापरताना दिसला आहे. यासोबतच, परप्पाना अग्रहारा तुरुंग दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे का याबद्दलही शंका निर्माण झाल्या आहेत.
गृहमंत्री झाले निरुत्तर
याविषयी एडिजिपी बी दयानंद यांनी तुरुंगात झडती घेऊन, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर प्रसारमाध्यमांनी याविषयी कर्नाटकाचे गृहमंत्री परमेश्वर यांना प्रश्न विचारले असता ते निरुत्तर होऊन काही न बोलता निघून गेले.