Kangana Ranaut
कंगना रनौत यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे Instagram
राष्ट्रीय

Kangana Ranaut |'कंगना रनौत यांची खासदारकी रद्द करा', याचिकेवर हायकोर्टाने जारी केली नोटिस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार कंगना रनौत यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. लायक राम नेगी नावाच्या एका व्यक्तीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत कंगना यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. याचिकेची दखल घेत हिमाचल हायकोर्टाने कंगना रनौत यांना नोटीस जारी केली आहे. जस्टिस ज्योत्सना रेवाल यांनी भाजप खासदार कंगना रनौत यांना २१ ऑगस्ट रोजी आपले उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.

कंगना रनौत यांनी काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना ७४ हजार, ७५५ मतांनी हरवलं होतं.

दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय?

वन विभागाचे माजी कर्मचारी असलेले लायक राम नेगी यांनी दाखल केलेल्या याचिकेत महटलं आहे की, लायक यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण मंडीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे नामांकन अर्ज चुकीच्या पद्धतीने नाकारले. आपल्या याचिकेत लायक राम नेगी यांनी सांगितले की, नामांकनावेळी त्यांच्याकडून सरकारी निवासाचे वीज, पाणी आणि टेलिफोनचे नो ड्यूज सर्टिफिकेट आणण्यास सांगण्यात आले होते. यासाठी त्यांना एका दिवसाचा वेळ देण्यात आला होता.

मग त्यांनी सर्व कागदपत्रे जमा केली. जेव्हा पुढील दिवशी त्यांनी रिटर्निंग ऑफिसरला कागदपत्रे दिली तर त्यांनी घेण्यास नकार दिला. मग नामांकन नाकारले. लायक राम नेगी यांनी कोर्टात सांगितले की, जर त्यांचा नामांकन अर्ज स्वीकारला असता तर आज ते निवडणूक जिंकले असते. नेगी यांनी हायकोर्टाकडे कंगना रनौत यांची खासदारकी रद्द करणे आणि पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती केली आहे.

SCROLL FOR NEXT