स्वत:ला चाबकाने फटके मारत द्रमुक सरकारविरोधात अण्णामलाईंचा आत्मक्लेश Pudhari
राष्ट्रीय

स्वत:ला चाबकाने फटके मारत DMK सरकारविरोधात अण्णामलाईंचा आत्मक्लेश

Anna University rape case : '४८ दिवस उपवास करणार'; अण्णामलाईं, पाहा व्हिडिओ

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील वाईटाचा नायनाट होण्यासाठी मी आज ( दि. २७) स्‍वत:ला सहा वेळा फटके मारणार असल्याचे गुरूवारी (दि.२७) भाजप नेते अण्णामलाई यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी कोईम्‍बतूर येथील त्यांच्या निवासस्‍थानाबाहेर आज स्वत:ला चाबकाने फटके मारल्याचा व्हिडिओ 'PTI'ने शेअर केला आहे.

'४८ दिवस उपवास करणार'; अण्णामलाईं

तामिळनाडू भाजप अध्यक्ष अण्णामलाई यांनी गुरूवारी (दि.२७) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की, "तामिळनाडूमध्ये जोपर्यंत द्रमुकचा पाडाव होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही.स्‍वत:ला सहा वेळा फटके मारणार तसेच राज्यातील भगवान मुरुगन यांच्या सर्व सहा पवित्र निवासस्थानी ४८ दिवस उपवास करणार" अशी घोषणा त्यांनी केली होती.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली

कोइम्बतूर येथे त्यांच्या गावी माध्यमांशी संवाद साधताना के. अण्णामलाईं यांनी द्रमुक सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी द्रमुक सरकारवर आरोप करताना संतप्त झालेल्या अण्णामलाईं यांनी आपले बूट काढले आणि "जोपर्यंत राज्यातील द्रमुक सरकार उलथून टाकले जात नाही तोपर्यंत आपण अनवाणी फिरणार", असल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला होता.

Anna University rape case : लैंगिक अत्याचार प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका

अण्‍णा विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्‍ह्यासंदर्भातील कागदपत्रे उघड केल्‍याने त्‍यांनी राज्य पोलिसांवरही सडकून टीका केली. पोलिसांनी या प्रकरणाने 19 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची ओळख उघड केली. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी द्रमुक नेत्‍यांशी संबंध असल्‍याने पोलिसांनी त्‍याचा गुन्‍ह्यातून उल्‍लेख वगळला आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

तामिळनाडूमधून द्रमुकला सत्तेतून बेदखल करत नाही तोपर्यंत मी अनावणी फिरणार आहे. मी राज्‍यातील जनतेला आवाहन करतो की त्‍यांनी सरकारचा कारभार पहावा. मी निवडणूक जिंकण्‍यासाठी पैसे वाटणार नाही. आम्‍ही पैसे न वाटत निवडणूक लढवणार आहोत, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT