Dr. Jyoti Waghmare Pudhari
राष्ट्रीय

Jyoti waghmare : ‘एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता‘, ज्योती वाघमारे यांचा गंभीर आरोप!

ठाकरे झुरळांच्या आंदोलनात सहभागी, शिवसेना वाघांचा पक्ष : ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटावर घणाघात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : गांधी जयंतीच्या दिवशी विरोधक संवैधानिक संस्थांवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे झुरळांच्या आंदोलनात सहभागी झाले. शिवसेना हा वाघांचा पक्ष आहे. मात्र झुरळांच्या आंदोलनात सहभागी होऊन आपण कोण आहोत, हे त्यांनी सिद्ध केले, अशी बोचरी टीका वाघमारे यांनी केली. त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. 

‘एकनाथ शिंदेंविरोधात कट रचल्याचा आरोप’

एकनाथ शिंदे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत धमक्या मिळाल्याचा संदर्भ देत वाघमारे यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवरही प्रश्न उपस्थित केले. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांना अनेक धमक्या आल्या. मात्र आवश्यक सुरक्षा दिली गेली नाही. हा एक प्रकारे त्यांना मारण्याचा कटच होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 

एसआयआरवरून विरोधकांवर निशाणा

एसआयआर ही देशात नियमितपणे होणारी महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगत वाघमारे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे समर्थन केले. संवैधानिक संस्थांवर कोणताही ठोस पुरावा नसताना संशय निर्माण करणे योग्य नाही. देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, त्यात संबंधितांना यश मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

‘पूर्णेकर प्रकरणाचे राजकारण करू नका’

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरूनही वाघमारे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. मीनाक्षी शिंदे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून, त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. मात्र, त्यांच्याच अटकेची मागणी का केली जात आहे? पूर्णेकर यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र या प्रकरणाचे राजकारण होता कामा नये. पूर्णेकर प्रकरणातील कारवाईचा संदर्भ देत वाघमारे यांनी दिशा सालियन प्रकरणाचाही उल्लेख केला. मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेची मागणी केली जात असेल, तर दिशा सालियन प्रकरणात तोच न्याय आदित्य ठाकरे यांना का लागू केला जात नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकरणात त्यांनी काय कारवाई केली?” असा सवाल त्यांनी केला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT