ज्योती मल्होत्रा. Photo Social Media
राष्ट्रीय

Jyoti Malhotra Case | ज्योतीकडे अशी कोणती माहिती होती? पाकच्या रस्त्यावर बंदुकधारी तरुणांच्या गराड्यात फिरतानाचा व्हिडिओ समोर

Jyoti Malhotra Case | पाकिस्तानची ज्योतीला व्हीआयपी सेवा; अनारकली बाजारपेठेतील प्रकार, स्कॉटिश युट्यूबरने फोडले बिंग

Akshay Nirmale

Jyoti Malhotra Case

नवी दिल्ली : हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, तिच्या पाकिस्तानमधील दौऱ्याचे धक्कादायक तपशील आता समोर येत आहेत.

स्कॉटलंडचा यूट्यूबर कॅलम मिल (Callum Mill) याने आपल्या व्हिडीओत उघड केले आहे की, मार्च महिन्यात लाहोरमधील अनारकली बाजारपेठेत ज्योती मल्होत्रा किमान 6 सशस्त्र सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरत होती. हे रक्षक एके-47 रायफल्ससह सज्ज होते आणि त्यांच्या जॅकेटवर "No Fear" असे लिहिलेले होते.

व्हिडीओत दिसली 'व्हीआयपी' वागणूक

कॅलम मिल याचे यूट्यूब चॅनल Callum Abroad हे जगभरातील प्रवास व्ह्लॉगसाठी प्रसिद्ध आहे. मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये प्रवास करत असताना त्याला अनारकली बाजारपेठेत ज्योतीची दृश्ये टिपता आली.

व्हिडीओत ज्योती मल्होत्रा स्वतःही व्ह्लॉग करताना दिसते आणि ती कॅलमला विचारते, "तुमचा पाकिस्तानमध्ये हा पहिलाच दौरा आहे का?" यावर कॅलम उत्तर देतो, "नाही, पाचव्यांदा आहे."

त्यानंतर कॅलमला जाणवते की तिच्यासोबत असलेल्या सशस्त्र व्यक्ती सुरक्षारक्षक आहेत. तो व्हिडीओत म्हणतो, "ती सुरक्षारक्षकांसोबत आहे. मला माहित नाही का, पण इतक्या बंदुकांची गरज काय आहे? तिच्या भोवती सहा बंदुकधारी आहेत."

कोण होते हे लोक?

सुरक्षारक्षक पोलीस किंवा अधिकृत लष्करी पोशाखात नव्हते, त्यामुळे ते खासगी सुरक्षारक्षक होते की गुप्तचर यंत्रणांचे सदस्य, हे स्पष्ट नाही. मात्र सामान्य पर्यटकासारखा फिरणारा स्कॉटिश यूट्यूबर एकटाच होता, तर भारतीय यूट्यूबरला 'व्हीआयपी' सुरक्षाव्यूह मिळाल्याचे दिसून आले.

ज्योतीचे उत्पन्न कमी लाईफस्टाईल मात्र अलिशान

भारतीय पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राला पाकिस्तान दौऱ्यादरम्यान अनेक उच्चभ्रूंच्या पार्टींजना आमंत्रित करण्यात आले होते, जिथे ती पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्कात आली. भारतात परतल्यानंतरही तिने त्यांच्याशी संपर्क ठेवला, असे तपासात समोर आले आहे.

तिच्या डिजिटल उपकरणांची तपासणी सुरु असून, तिने कोणती माहिती पाकिस्तानला दिली, याचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर तिच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरु आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तिची जीवनशैली तिच्या उत्पन्नाशी जुळून येत नाही. ती कायम फर्स्ट क्लासने प्रवास करत होती, आलिशान हॉटेलमध्ये राहत होती आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवत होती.

ज्योतीच्या पाकिस्तान तसेच चीन दौऱ्याचीही चौकशी

पाकिस्तानहून परतल्यावर काहीच दिवसात ज्योती मल्होत्राने चीनचा दौरा केला, तिथेही तिचा 'लॅविश' प्रवास आणि हाय-एन्ड ज्वेलरी शॉप्सला दिलेल्या भेटींमुळे तिच्याबाबत आणखी संशय निर्माण झाला आहे. ह्या दौऱ्याचेही प्रायोजक कोण होते, याचा तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT