पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून जम्मू-काश्मीरमधील शिक्षक, कॉन्स्टेबलसह ३ सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई आज (दि.१५) जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून एक पोलिस कॉन्स्टेबल, एक शिक्षक आणि वन विभागाचा अधिकारी या तीन सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांना "जास्त किंमत" देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याने अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले. गेल्या काही वर्षांत, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याबद्दल ७० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.