J&K Police RDX seized Faridabad file photo
राष्ट्रीय

J&K Police: जम्मूचा डॉक्टर बनला 'जैश'चा दहशतवादी, पोलिसांना दिलेल्या 'टीप'मुळे हाती लागलं 300 किलो RDX

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या फरिदाबादमध्ये मोठी कारवाई केली आहे.

मोहन कारंडे

J&K Police RDX seized Faridabad

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीवरून ३०० किलो आरडीएक्स, दोन एके-४७ रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.

डॉक्टर बनला 'जैश'चा दहशतवादी

डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव असून, तो अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर यांने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर येथून श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती.

शस्त्र साठा कोणी लपवला होता?

सध्या डॉ. आदिल जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदिल राथरची चौकशी केली असता अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघड झाल्या आहेत. दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन डॉक्टर होते. त्यातील दोघांना अटक करण्यात आली, मात्र तिसरा डॉक्टर अजूनही फरार आहे.

तपासादरम्यान, डॉ. राथरने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथे छापा टाकला. या छाप्यात ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. डॉ. राथर हा अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहिवासी आहे.

कॉलेज लॉकरमधूनही शस्त्रे जप्त

यापूर्वी, जॉइंट इंटरोगेशन सेंटर अनंतनागच्या गुप्तचर माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी जीएमसी अनंतनाग येथील डॉ. राथर यांच्या वैयक्तिक लॉकरची तपासणी केली होती. त्यावेळी, लॉकरमधून आणखी एक एके-४७ असॉल्ट रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

तपास यंत्रणांकडून कसून चौकशी

पोलिस आता ही शस्त्रे आणि प्रचंड स्फोटकांचा साठा कोठून आला, डॉक्टर ते कशासाठी बाळगत होते आणि त्यांचे अन्य दहशतवादी कारवायांशी काही संबंध आहेत का, या दिशेने कसून तपास करत आहेत. दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका उच्चशिक्षित डॉक्टरचा सहभाग उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT