नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळविण्यापासून रोखले नसते, तर पुढील एक वर्षात संविधान बदलले गेले असते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. वंचित बहुजन आघाडीने आता तरी परिस्थितीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गुरूवारी (दि.६) आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, संविधानाच्या रक्षणासाठी बहुजनांसह वंचित बहूजन आघाडीने परिस्थितीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील जबाबदारीतून मोकळे करण्याची मागणी केल्याबद्दल विचारले असता, आव्हाड यांनी सध्याचे राजकारण पाहता, एक बॉलमध्ये दोन विकेट निघू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली.
अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळू शकेल. आदिती तटकरे या राज्यात मंत्री असल्याने त्यांचे वडील सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनतेमध्ये अस्वस्थता दिसत असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :