नवी दिल्ली : झारखंड सचिवालय सेवा संघाने प्रस्तावित कर्मचारी कपातीच्या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. झारखंड सचिवालयाचा सेवा सूचनांमध्ये सुधारणा आणि ई-ऑफिस अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. त्या आडून सरकारद्वारे कामगार कपात प्रस्तावित असल्याचे सचिवालय सेवा संघाने म्हटले.
दरम्यान, या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी संघटनेच्या विविध शिष्टमंडळांनी मंत्री इरफान अन्सारी, योगेंद्र प्रसाद, सुदिव्य सोनू, राधा कृष्ण किशोर, चामरा लिंडा, दीपक बिरुआ आणि हाफिजुल हसन अन्सारी यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रस्तावित कर्मचारी कपात प्रकरणाची माहिती दिली. संघटनेच्या विविध शिष्टमंडळात सिद्धार्थ शंकर बेसरा, धर्मेंद्र कुमार, रितेश कुमार, जयकांत पंडित, दीप्ती हेरेंझ, अमित कुमार, राजेश कुमार सिंग आदी सहभागी होते.