jcb ने पाडलेली घराची भिंत व इनसेटमध्ये पत्‍नी उर्मिला.  
राष्ट्रीय

Jharkhand News | ‘माहेरचे घरचं राहिले नाही तर बायको माहेरी जाईलच कशी’ : झारखंडमधील नवरोबा पोहचला सासुरवाडीत JCB घेऊन!

वारंवार बायको माहेरी जाण्याला कंटाळलेल्या नवऱ्याने केले अजब धाडस

Namdev Gharal

झारखंड मधील पती पत्‍नीच्या भांडणातून एक अजब प्रकार समोर आला आहे. बायको बरोबर भांडण करुन तिला सतावणे हेच रोजचे काम असलेल्या नवऱ्याला कंटाळून बायको वारंवार माहेरी जात असे. यातून या नवरोबाला संताप आला त्‍याने चंग बांधला की माहेरचे घरच ठेवायचे नाही. माहेरच नसेल तर बायको कशी माहेरी जाते हे बघतोच असे ठरवले व तो चक्क जेसीबी घेऊनच पत्‍नीच्या माहेरी पोहचला.

ही घटना आहे झारखंड मधील. जमिया पोलिस स्टेशन हद्दीतील सिरसिया गावात ही अजब घटना घडली. आहे पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटू मंडल नावाच्या पतीचा हा कारनामा आहे. त्‍याची पत्‍नी उर्मिला ही दररोजच्या भांडणाला कंटाळून माहेरी जात असे. उर्मिलाचे माहेर हे सिरसिया गावात आहे तर सासर हे गादी-चुंगलो या गावात अगदी थोड्या अंतरावर आहे.

उर्मिलाच्या म्हणन्यानुसार पती पिंटू हा वारंवार दारु पिऊन येत असे व भांडण काढत असे. त्‍यामुळे उर्मिला माहेर जवळच असल्याने वडिलांच्या घरी जात असे. याचा राग पिंटूला होता त्‍याने भांडणात उर्मिलाला तुझे घरच पाडतो मग माहेरी कशी जातेस अशी धमकी दिली.

आणि जेसीबी घेऊन पोहचला थेट सासरच्या दारात

बुधवारी उर्मिला व पिंटूचे परत भांडण झाले. उर्मिला माहेरी निघून गेली याचा त्‍याला भयंकर राग आला. धमकी खरी करण्याचा चंग पिंटूने बांधला व तो थेट jcb घेऊन पोहचला. त्‍याने घराचे कंपाऊंड पाडण्यास सुरवात केली. आवाज ऐकून घरचे बाहेर आले. त्‍यानी व पत्‍नी उर्मिला हिने समजवण्याचा प्रयत्‍न केला. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

कुंपणाची भिंत पाडली

बुधवारी रात्री रागात असलेल्या पिंटूने पहिल्यांदा घराच्या कुंपनाची भिंत पाडली. सारवाडी व त्‍याचा वाद सुरुच होता पण हा गोंधळ ऐकून गावचे लोक जमा होऊ लागले. त्‍यानंतर मात्र त्‍याने जेसीबीसह पळ काढला. याप्रकरणी जमिया पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्‍याने घरीच मंडळी झोपेत असताना जेसीबी चालवून भिंत पाडली. यावेळी तो मोठ्याने ओरडत होता घरच पाडतो मग कशी माहेरला येते ते पाहतोच. यानंतर जमाव जमा झाल्याने त्‍याने पळ काढला. याप्रकरणाचा पोलिस आला तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT