पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. ८१ जागांपैकी ४३ जागांवर भाजप प्रणित एनडीए आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणी इंडिया आघाडीने पिछाडीवरुन ४६ जागांवर आघाडी घेतली आहे. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा २७, काँग्रेस ११, राष्ट्रीय जनता दल ६, इतर २ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए 25 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप २३ व अन्य पक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.
सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी झाली. यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. मतमोजणी स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. झारखंडमध्ये यावेळी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिला टप्पा 13 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला पार पडला. यावेळी राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.