Rat Burnt Alive in Jhansi :  
राष्ट्रीय

Rat Burnt Alive in Jhansi | जिवंत उंदराला दोरीने बांधून जाळले, व्हिडीओ व्हायरल : पोलिसांनी केली चार तरुणांना अटक

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संताप, झाशी येथील प्रकार!

Namdev Gharal

Animal Cruelty Case झाशी: उत्तर प्रदेशातील झाशी शहरातून प्राण्यांवरील क्रौर्याची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे चार तरुणांनी एका जिवंत उंदराला दोरीने बांधून जाळून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे. झाशी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरछा गेट परिसरातील ही घटना घडली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ४७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी एका उंदराला दोरीने बांधून आणतात. त्यानंतर त्याला एका दरवाजाला बांधले जाते आणि त्याच्यावर तेल टाकून त्याला जिवंत पेटवून दिले जाते. उंदीर आगीत तडफडत असताना आरोपी मात्र त्याचे व्हिडिओ बनवत होते. व्हिडिओ व्हायरल होताच झाशी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून व्हिडिओत दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटवली.

चार आरोपींना अटक, गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी शहर कोतवालीमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुनैद कुरेशी, जीशान कुरेशी, आसिफ कुरेशी आणि शफीक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

या कारवाईबाबत माहिती देताना शहर पोलीस अधिकारी (सीओ) प्रिया सिंह यांनी सांगितले, "सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आला होता, ज्यामध्ये एका जिवंत उंदरावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्यात आले होते. या व्हिडिओची तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.’ पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT