Jewellery Shops No Entry Burqa Ghoonghat: उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये आता बुरखा आणि घूंगट घालून सोने दुकानदारांना गंडा घालता येणार नाहीये. आता झांसीमध्ये जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला बुरखा आणि घुंघट न घालताच यावं लागणार आहे. तुम्हाला कॅमेऱ्यावर तुमचा चेहरा दिसल्यानंतरच दागिने खरेदी करता येणार आहेत.
आता हे झांसी मधील सर्व ज्वेलरी शॉपवर होणार आहे. आता ज्वेलरीच्या प्रत्येक दुकानाबाहेर अशा आशयाची सूचना चिकटवण्यात आली आहे. याला पोलिसांची देखील परवानगी आहे. सीपरी बाजार सराफा व्यापार मंडळाच्या आवाहनानंतर अशा आशयाची सूचना जवळपास प्रत्येक दुकानाबाहेर चिकटवण्यात आली आहे. आता असे आवाहन जिल्ह्यातील इतर बाजारातील सराफा व्यापाऱ्यांना देखील करण्यात येणार आहे.
सराफा बाजार मंडळाचे अध्यक्ष उदय सोनी यांनी सांगितलं की, 'काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला चेहरा झाकून खरेदी करण्यासाठी येतात अन् चोरी करून जातात. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद होते. मात्र गुन्हेगाराने बुरखा घातल्यामुळं त्यांचा चेहरा दिसत नाही. त्यामुळं त्यांना पकडणं अवघड होऊन जातं. त्यामुळं पोलिसांकडे महिलांना बिना पर्दा खरेदी करण्याचे आवाहान दुकानाबाहेर चिकटवण्याची परवानगी मागण्यात आली होती.