जेईई मेन २०२६ च्या परीक्षेची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली. जानेवारी २०२६ मध्ये परीक्षा आयोजित केली जाणार असून, यंदा परीक्षेच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
JEE Main 2026 : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)ने संयुक्त प्रवेश परीक्षेत (JEE Main 2026) व्हर्च्युअल किंवा ऑन-स्क्रीन कॅल्क्युलेटर वापरण्याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. पूर्वी जारी केलेल्या सूचनेत सुधारणा करत आता परीक्षेत कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
जेईई मेन २०२६ च्या परीक्षेची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली. जानेवारी २०२६ मध्ये परीक्षा आयोजित केली जाणार असून, यंदा परीक्षेच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, एनटीएने जेईई मेन परीक्षेत कॅल्क्युलेटरच्या वापराबाबत एक सूचना जारी केली होती. 'ऑनस्क्रीन' कॅल्क्युलेटरची माहिती चुकीची पूर्वीच्या माहिती पत्रकात असे नमूद करण्यात आले होते की, संगणक-आधारित चाचणी (CBT) दरम्यान 'ऑनस्क्रीन स्टॅंडर्ड कॅल्क्युलेटर' उपलब्ध असेल. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे आणि ती जेईई मेन परीक्षेला लागू होत नसल्याचे एजन्सीने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे, कॅल्क्युलेटर (तो कोणत्याही स्वरूपाचा असो- प्रत्यक्ष किंवा ऑनस्क्रीन) वापरण्याची परवानगी असणार नाही.
एनटीएने त्यानंतर त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जेईई (मेन) २०२६ साठी सुधारित माहिती बुलेटिन अपलोड केले आहे, ज्यामध्ये टायपोग्राफिकल त्रुटी दुरुस्त केली आहे आणि परीक्षा आयोजित करण्यासंबंधीच्या नियमांची पुष्टी केली आहे. "जेईई मेन २०२६ साठीच्या माहिती पत्रकातील परिशिष्ट-VIII मध्ये (जे एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले आहे), संगणक-आधारित चाचणी (CBT) दरम्यान ऑनस्क्रीन मानक कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल, असा उल्लेख आहे. तथापि, ही सुविधा सामान्य परीक्षा घेणाऱ्या प्लॅटफॉर्मचा भाग आहे आणि ती एनटीएद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या जेईई (मेन) परीक्षेला लागू होत नाही. कारण या परीक्षेत कोणत्याही स्वरूपात कॅल्क्युलेटरच्या वापरास परवानगी नाही." “JEE (मुख्य) २०२६ च्या माहिती बुलेटिनमधील टायपोग्राफिक त्रुटीबद्दल आणि उमेदवारांना झालेल्या गैरसोयीबद्दल NTA दिलगीर असल्याचेही बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
उमेदवारांनी सुधारित माहिती बुलेटिन डाउनलोड करण्याचा आणि परीक्षेशी संबंधित नवीनतम अपडेट्स आणि स्पष्टीकरणांसाठी NTA च्या अधिकृत वेबसाइट: nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in ला भेट आवाहनही करण्यात आले आहे.