Qunit
राष्ट्रीय

Fact Check | जया किशोरी मॉडेलिंग करत होत्या का? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या जया किशोरी यांनी फिल्ड इंडस्ट्रीत नशिब आजमावले होते, असा दावा केला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

The Quint

आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या जया किशोरी यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटो शेअर करणारे असा दावा करत आहेत की हे जया किशोरी यांचे हे जुने फोटो आहेत आणि पूर्वी त्या फिल्म इंडिस्ट्रीत नशिब आजमावत होत्या. या व्हायरल फोटोंचे फॅक्टचेक द क्विंटने (The Quint) केले आहे.

वापरकर्ते काय म्हणत आहेत?

एका युजरने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, "मॅडम यांचा हा फोटो तेव्हांचा आहे, जेव्हा त्या फिल्मी जगतात नाव कमवू इच्छित होत्या. त्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला की बाबा बनणे सर्वांत सोपे आहे."

हा फोटो खरा आहे का?

नाही. हा फोटो खरा नाही. आर्टिफिशिअल इंटलेजिन्सवर बनवलेल्या फोटोंत ज्या तृटी दिसतात, त्या या फोटोत आहेत.

हा फोटो पडताळण्यासाठी आम्ही दोन साधनांचा आधार घेतला, त्यातून हा फोटो आर्टिफिशिअल इंटलेजिन्सवर बनण्यात आल्याची शक्यात सर्वाधिक दिसून आली.

  • जया किशोरी यांच्याबद्दल सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही विश्वासार्ह बातमीत हा फोटो वापरण्यात आलेला नाही.

  • या फोटोमध्ये हाताची बोटांच्या प्रतिमा एकमेकांत ब्लर झाल्याचे दिसते. AIचा वापर करून बनवलेल्या फोटोंमध्ये अशा प्रकारच्या तृटी नेहमी राहतात.

  • या फोटोंची पडताळणी True Media आणि Hive Moderation या दोन साधनांवर करण्यात आली. त्यातून हे फोटो AI वर बनवण्यात आल्याचे पुरेसे पुरावे मिळाले.

या फोटोत बऱ्याच तृती आहेत.

निष्कर्ष

जया किशोरी यांचे हे फोटो फेक असून ते AIच्या मदतीने बनवण्यात आलेले आहेत.

This story was originally published by The Quint (Fact-Check: This Image of Spiritual Speaker Jaya Kishori Is AI-Generated) and republished by Pudhari as part of the Shakti Collective

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT