राष्ट्रीय

January 2026 School Holidays : जानेवारी महिन्यात शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या; पालकांनो, ट्रिपचे नियोजन करताय ना?

January holidays for schools : नवीन वर्षापासून प्रजासत्ताक दिनापर्यंत मिळणार मोठी विश्रांती.

रणजित गायकवाड

January 2026 School Holidays Parents Plan Your Trip Now

विद्यार्थी आणि पालकांसाठी जानेवारी महिना सुट्ट्यांच्या दृष्टीने अत्यंत खास ठरणार आहे. उत्तर भारतातील कडाक्याची थंडी आणि देशाच्या विविध भागांतील महत्त्वाचे सण यामुळे शाळांना अनेक दिवस सुट्टी राहणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापासून ते प्रजासत्ताक दिनापर्यंत, या महिन्यात विद्यार्थ्यांची अभ्यासातून अनेकदा सुटका होणार आहे.

उत्तर भारतात हिवाळी सुट्ट्यांचा मोठा काळ

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आणि धुक्यामुळे शाळांना दीर्घकालीन सुट्टी जाहीर केली जाते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये साधारणपणे डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेली सुट्टी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू असते.

हरियाणा : राज्य सरकारने १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत अधिकृत हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेश : या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडून सुट्ट्यांमध्ये वाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे.

जानेवारी २०२६ मधील सुट्ट्यांची यादी

  • १ जानेवारी : गुरुवार : इंग्रजी नवीन वर्ष

  • १४ जानेवारी : बुधवार : मकर संक्रांती/पोंगल/माघ बिहू

  • १५ जानेवारी : गुरुवार : पोंगल (दक्षिण भारतीय राज्ये)

  • २३ जानेवारी : शुक्रवार : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (पश्चिम बंगाल)

  • २६ जानेवारी : सोमवार : प्रजासत्ताक दिन (राष्ट्रीय सुट्टी)

दक्षिण आणि ईशान्य भारतात सणांचा उत्साह

दक्षिण भारतात जानेवारी महिन्यातील सुट्ट्या मुख्यत्वे 'मकर संक्रांती' आणि 'पोंगल' यांसारख्या कापणीच्या सणांशी संबंधित असतात.

तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश : पोंगलच्या निमित्ताने १४ ते १७ जानेवारी दरम्यान शाळांना मोठी सुट्टी असेल.

आसाम : माघ बिहू सणानिमित्त शाळा बंद राहतील.

गुजरात : उत्तरायणानिमित्त साधारणपणे दोन दिवसांची सुट्टी दिली जाते.

लॉन्ग वीकेंडची संधी

२६ जानेवारी रोजी 'प्रजासत्ताक दिन' सोमवारी येत आहे. तत्पूर्वी २४ जानेवारी (शनिवार) आणि २५ जानेवारी (रविवार) असल्याने विद्यार्थ्यांना सलग तीन दिवसांचा 'लॉन्ग वीकेंड' मिळणार आहे.

राज्यानुसार सुट्ट्यांमध्ये बदल

शाळांच्या सुट्ट्या या संबंधित राज्य सरकार, शिक्षण मंडळ (CBSE, ICSE किंवा राज्य बोर्ड) आणि स्थानिक जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानुसार बदलू शकतात. काही राज्यांमध्ये ६ जानेवारीला 'गुरु गोविंद सिंह जयंती'निमित्त देखील सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.

पालकांसाठी महत्त्वाची सूचना : पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेने किंवा शिक्षण मंडळाने जारी केलेले अधिकृत 'हॉलिडे कॅलेंडर' आवर्जून तपासावे. कडाक्याची थंडी किंवा हवामानातील बदलाचा विचार करून स्थानिक प्रशासन ऐनवेळी सुट्ट्यांमध्ये बदल करू शकते, याची नोंद घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT