women donate gold Iranकाश्मीरमधील महिलांकडून इराणसाठी सोने नाणे, चांदीची भांडी, पैसे जमा केले जात आहेत. इराणमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे तेथील जनतेला सरकारला मदत म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. इराण वर इस्त्रायल व अमेरिकेने 28 फेब्रूवारी रोजी हल्ला केल्यानंतर तेथे युद्ध सुरु झाले आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी मारले गेले होते यावेळीही जम्मू काश्मिरमध्ये दुखाचा मातम केला गेला होता. आता इराणला मदत म्हणून हे लोक आर्थिक वस्तू स्वरुपात मदत जमा करत आहेत.
जम्मू काश्मिरमधील बडगाम येथे एका मशिदीत ही मदत जमा केली जात आहे. या मदतीमध्ये पैसे, चांदीची भांडी दिली जात आहे. यामध्ये क्यू आर स्कॅनरही ठेवले आहेत. तसेच काही महिलांनी इराण मदत करण्यासाठी आपले सोन्याचे दागिनेही दान केले आहेत.
माणुसकीसाठी मदत
इराणने सार्वजनिकरित्या मदत करण्याचे आवाहन केले होते. यालाच प्रतिसाद म्हणून बडगाम मध्ये मदत द्यावी यासाठी स्टॉल लावला आहेत. यावेळी येथील स्थानिक लोकांनी इराणला आमच्याकडून थोडीशी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
शियाबहूल भागातील तरुणांकडून देणगी
दरम्यान रविवारी, काश्मीर खोऱ्यातील शिया बहुल भागातील तरुणांनी युद्धामुळे प्रभावित झालेल्या इराणमधील लोकांसाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा केली. या मोहिमेत पुरुष, महिला आणि अगदी लहान मुलांसह सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते.
इराण दुतावासाने मानले आभार
या काश्मिरी जनतेने दिलेल्या मदतीबद्दल भारतातील इराणी दुतावासाने आभार मानले आहेत. आम्ही अत्यंत कृतज्ञतेने काश्मीरमधील दयाळू जनतेचे आभार मानतो, जे त्यांच्या मानवतावादी मदतीद्वारे आणि मनापासून दिलेल्या पाठिंब्याद्वारे इराणच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तुमची ही दयाळू वृत्ती आणि माणुसकी आम्ही कधीही विसरणार नाही असे म्हटले आहे.