जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. Pudhari AI Genrated Photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu Kashmir encounter|घटनास्थळावरुन AK-47 जप्त

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे चकमक सुरू असून, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्‍यात सुरक्षा दलास यश आल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे.

जवानांचा परिसराला वेढा

सुरक्षा दलांनी आज सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील जचलदाराच्या क्रुम्भुरा भागात एसओजी हंदवाडाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरून पळून गेले हाेते. यानंतर जवानांनी परिसराला वेढा दिला हाेता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जचलदाराच्या क्रुम्हुरा गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांच्‍या जवानांनी चाेख प्रत्‍युत्तर दिले.परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. जोरदार गोळीबार झाला. परिसर सील करण्यात आला आहे. अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्याच वेळी, सुरक्षा दलांनी नागरिकांना घरातच राहण्याचा आणि चकमकीच्या ठिकाणी फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

एका दहशतवादाचा खात्मा

चकमकीत एका दहशतवादीचा खात्मा करण्‍यात सुरक्षा दलांना यश आले हे. या चकमकीदरम्यान AK-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. चकमक अजूनही सुरू आहे आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. या चकमकीत दहशतवाद्याच्या मृतदेहाव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या वस्तूही जप्त होण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईबाबत सुरक्षा दल सतर्क आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT