जम्मू-काश्मीर निवडणूक file photo
राष्ट्रीय

Jammu Kashmir Election | दुपारी ३ वाजेपर्यंत ५६.०१ टक्के मतदान

पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (दि. १) मतदान होत आहे. सात जिल्ह्यांतील ४० जागांवर मतदान होत असून ३९ लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ५६.०१ टक्के मतदान झाले. मदारसंघ आणि दुपारी तीनपर्यंत झालेले मतदानाची टक्‍केवारी कंसात : बांदीपूर ( 53.09), बारामुल्ला ( 46.09), जम्मू ( 56.74), कठुआ ( 62.43 ), कुपवाडा (52.98), सांबा ( 63.24), उधमपूर ( 64.43)

पाकिस्तानशी बोलण्याची गरज नाही : मीर जुनैद

कुपवाडा येथील जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद म्हणाले की, जोपर्यंत ते दहशतवादी पाठवणे आणि लोकांना मारणे थांबवत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी (पाकिस्तान) बोलण्याची गरज नाही. हे सर्व राजकीय पक्ष जनतेला मूर्ख बनवत आहेत. उद्या ते म्हणतील की आम्हाला चीनशी बोलायचे आहे. त्यांच्याशी आपण कसे बोलणार? ज्या देशाशी बोलणे योग्य आहे अशा देशाशी आपण बोलावे, अशी लोकांची इच्छा आहे, असे जुनैद यांनी म्हटले आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंत 44.08 टक्के मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 44.08 टक्के मतदान झाले.

बांदीपूर जिल्ह्यात 42.67 टक्के मतदान

बारामुल्ला जिल्ह्यात 36.60 टक्के मतदान

जम्मू जिल्ह्यात 43.36 टक्के मतदान

कठुआ जिल्ह्यात ५०.०९ टक्के मतदान

कुपवाडा जिल्ह्यात 42.08 टक्के मतदान

सांबा जिल्ह्यात ४९.७३ टक्के मतदान झाले

उधमपूर जिल्ह्यात ५१.६६ टक्के मतदान झाले

सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले आहे.

बांदीपूर जिल्ह्यात 28.04 टक्के मतदान

बारामुल्ला जिल्ह्यात 23.20 टक्के मतदान

जम्मू जिल्ह्यात 27.15 टक्के मतदान

कठुआ जिल्ह्यात 31.78 टक्के मतदान

कुपवाडा जिल्ह्यात 27.34 टक्के मतदान झाले

सांबा जिल्ह्यात 31.50 टक्के मतदान

उधमपूर जिल्ह्यात 33.84 टक्के मतदान

माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी बजावला मतदानाचा हक्क 

जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते कविंदर गुप्ता यांनी जम्मूतील जानीपूर येथील विद्या ज्योती मॉडेल हायस्कूलमध्ये मतदान केले.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले मतदान

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बहू विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले.

कोणत्याही पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत

कुपवाडा येथील अवामी इत्तेहाद पार्टी (AIP) चे अध्यक्ष शेख अब्दुल रशीद उर्फ ​​इंजिनियर रशीद म्हणाले की, “कोणताही पक्ष 25 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. जम्मू आणि काश्मीर हे विशेष राज्य आहे, पण ते षड्यंत्रांचे केंद्र बनले आहे. जर मला प्रचारासाठी आणखी एक आठवडा मिळाला असता, तर आम्ही 35-40 जागा जिंकल्या असत्या."

9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाले आहे.

बांदीपूर जिल्ह्यात 11.64 टक्के मतदान

बारामुल्ला जिल्ह्यात ८.८९ टक्के मतदान

जम्मू जिल्ह्यात 11.46 टक्के मतदान

कठुआ जिल्ह्यात १३.०९ टक्के मतदान

कुपवाडा जिल्ह्यात 11.27 टक्के मतदान

सांबा जिल्ह्यात १३.३१ टक्के मतदान झाले

उधमपूर जिल्ह्यात 14.23 टक्के मतदान

भाजपचे उमेदवार शाम लाल शर्मा यांनी केले मतदान

जम्मू उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शाम लाल शर्मा यांनी जम्मूच्या पुरखु सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

पंतप्रधान मोदींनी मतदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, "जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आज तिसरी आणि शेवटची फेरी आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी मतदान करावे. मला विश्वास आहे की यासोबतच जे तरुण मित्र पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यामध्ये महिला शक्तीही मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होणार आहे.

मतदान सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. केंद्रशासित प्रदेशातील 7 जिल्ह्यांतील 40 मतदारसंघातील पात्र मतदार आज मतदान करत आहेत. 40 मतदारसंघांपैकी 24 मतदारसंघ जम्मू विभागात येतात आणि 16 काश्मीरमध्ये येतात.

SCROLL FOR NEXT