Jammu Kashmir Shopian terror surrender  file photo
राष्ट्रीय

Jammu Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

Shopian terror surrender | जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कारवाईदरम्यान दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

मोहन कारंडे

Jammu Kashmir Shopian terror surrender |

जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी गुरूवारी आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शोपियानमधील बास्कुचन भागात सुरक्षा दलांनी बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान, लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन एके-५६ रायफल, ४ मॅगझिन, १०२ राउंड (७.६२x३९ मिमी), २ हँडग्रेनेड, २ पाउच इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT