पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मिरच्या बारामूल्ला जिल्ह्यात सोपोर येथे सैन्यदल व दहशतवाद्यांमध्ये चकमक घडल्याची माहीती समोर आली आहे. सैन्याकडून जॉईंट सर्च ऑपरेशन सुरु असताना ही गोळीबाराची घटना घडली. सोपोर मधील गुज्जरपेटी येथील जालूरा या गावात हे दहशतवादी लपून बसले आहेत. त्यांना घेरांबदी घातली असून सैनिक तपास करत आहेत.
दरम्यान ७ जानेवारी रोजी १६३ टेरोटेरीअल आर्मीवर ग्रेनेड फेकणाऱ्या तीन दहशतवाद्यांना १२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक हँड ग्रेनेड, एके सिरीज रायफल, पिस्तूल २५० एके सिरीज बंदूकीचे राऊंड, व २१ पिस्तूलचे राऊंड जप्त करण्यात आले आहेत.