राष्ट्रीय

Loksabha Election: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक मतदान

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.20) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेत बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात 59 टक्के इतके उल्लेखनीय मतदान झाले. ही टक्केवारी आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे, असे जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पी.के.पोले यांनी सांगितले.

या मतदारसंघात यापूर्वी सर्वाधिक मतदान 1984 मध्ये झाले होते. त्यावेळी 58.84 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सुधारित सुरक्षा परिस्थिती आणि गेल्या तीन दशकांपासून प्रचलित असलेल्या प्रायोजित बहिष्कार कॉलच्या कमी होत असलेल्या प्रभावाबद्दल समाधान व्यक्त करत मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती.

परिस्थिती सुधारली आहे तसेच लोकांमधील भीती ओसरली आहे. हे लोकशाहीसाठी हे चांगले संकेत आहेत. लोकांनी भूतकाळात त्यांच्या जीवाला धोका असल्याने बहुतेक वेळा मतदान केले नाही, परंतु यावेळी, कोणत्याही स्तराच्या हस्तक्षेपाशिवाय जोरदार मतदान होत आहे.

– अब्दुल अहद भट (सोइबुगचे स्थानिक नागरिक)

मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात आणि बारामुल्ला मतदारसंघाचा एक भाग असलेले सोइबुग हे प्रतिबंधित दहशतवादी गट हिजबुल मुजाहिद्दीनचा पाकिस्तानस्थित नेता सय्यद सल्लुद्दीन याचे मूळ गाव आहे. या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे उमेदवार आहेत. या बरोबरच मतदारांनी बेरोजगारी आणि वाढलेली वीज बिले ह्या त्यांच्यासमोरील  प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकला.

मोहम्मद येवर या मतदाराने नमूद केले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये उपराज्यपालांच्या नेतृत्वाखालील प्रशासन पाच वर्षांपासून निवडून आलेल्या सरकाराशिवाय राज्य करत असल्याने नागरिक त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडू शकले नाहीत. तसेच कलम 370 रद्द केल्यानंतर या खोऱ्यातील ही निवडणूक लोकांना त्यांच्या समस्या ऐकू शकेल आणि त्यांच्या समस्या सोडवू शकेल असा नेता निवडण्याची संधी प्रदान करेल अशी आशा व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT