जम्‍मू-काश्मीर : पूंछमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार File Photo
राष्ट्रीय

जम्‍मू-काश्मीर : पूंछमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्‍यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. काल म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे. परंतु सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून होणारी ही घुसखोरी उधळून लावली आणि तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.

प्रत्यक्षात, पूंछमधील नियंत्रण रेषेवरील खरमल भागात तैनात असलेल्या लष्करी जवानांना काही हालचाल दिसली. घुसखोरीची शक्यता लक्षात येताच, सैनिकांनी जवळच्या सुरक्षा चौक्यांना सतर्क केले आणि दहशतवादी दिसताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे.परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT