Jammu and Kashmir News
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून दोन महिला ठार झाल्‍या असून, २५ जण जखमी झाले आहेत.   X ANI
राष्ट्रीय

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये बस दरीत कोसळून दोन ठार, २५ जखमी

पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज (दि.१३) बस दरीत कोसळून दोन महिला ठार झाल्‍या असून, २५ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.

खासगी बस भालेसाहून थाथरीला जात होती. सकाळी साडेदहाच्‍या सुमारास भाट्याजवळ बस २०० फूट खोल दरीत कोसळली. एक महिला जागीच ठार झाली तर दुसरीचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. अन्य नऊ जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर डोडा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT