जम्मू-काश्मीर निवडणूक file photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

मोहन कारंडे

जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६ जिल्ह्यातील २६ जागांसाठी बुधवारी ५ पर्यंत ५९ टक्के मतदान झाले. रियासीमध्ये सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले, तर श्रीनगरमध्ये सर्वात कमी २७ टक्के मतदान झाले.

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी आज (दि. 25) मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत शांततेत ३७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी आज (दि. 25) मतदान होत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 24 टक्के पेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे.

ओमर अब्दुल्ला संतापले; म्हणाले, हे चांगले नाही...

जम्मू आणि काश्मीरमधील मतदान प्रक्रियेचे साक्षीदार होण्यासाठी परदेशी शिष्टमंडळाच्या भेटीवर, जेकेएनसीचे उपाध्यक्ष आणि उमेदवार ओमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर ही आमची अंतर्गत बाब आहे इतरांनी हस्तक्षेप करू नये, असे सरकारकडून सांगितले जाते, तर राजनैतिक अधिकाऱ्यांना येथे का आणले, असा सवाल अब्दुल्ला यांनी केला आहे.

निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी 16 देशांचे राजनैतिक अधिकारी

निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी 16 देशांचे राजनैतिक अधिकारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, गयाना, दक्षिण कोरिया, सोमालिया, पनामा, सिंगापूर, नायजेरिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, टांझानिया, रवांडा, अल्जेरिया यासह 16 देशांतील राजनयिकांचा समावेश असून ते जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत.

सकाळी 9 वाजेपर्यंत 10.22 टक्के मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.२२ टक्के मतदान झाले आहे.

बडगाममध्ये 10.91 टक्के मतदान

गांदरबलमध्ये 12.61 टक्के मतदान

पूंछमध्ये 14.41 टक्के मतदान झाले

राजोरी येथे 12.71 टक्के मतदान झाले

रियासीमध्ये १३.३७ टक्के मतदान झाले

श्रीनगरमध्ये 4.70 टक्के मतदान

गंदरबलमध्ये मतदारांचे मतदानानंतर वृक्षारोपण  

गंदरबल मतदारसंघातील बागू रामपोरा येथील मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदारांनी मतदान केल्यानंतर वृक्षारोपण केले. जेकेएनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे येथून निवडणूक लढवत आहेत, त्यांची पीडीपीचे बशीर अहमद मीर यांच्याशी लढत होत आहे.

भाजपचे उमेदवार रविंदर रैनाने मतदान

भाजपचे नेते आणि नौशेरा मतदारसंघातील उमेदवार रविंदर रैना यांनी नौशेरा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

१०२ वर्षीय मतदाराचे तरूणांना आवाहन  

१०२ वर्षीय हागी करम दिन भट यांनी रियासी येथील मतदान केंद्रावर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान केले. मतदानानंतर ते म्हणाले की, "चांगले सरकार स्थापन झाले तर खूप कामे होतील. तरुणांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे, उद्योगधंदे उभारले पाहिजेत. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आज जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा आहे. मी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो आणि लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या निमित्ताने मी त्या सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन करतो. जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Jammu-Kashmir Election 2nd Phase) दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. सहा जिल्ह्यांतील २६ जागांसाठी मतदान सुरू आहे. या टप्प्यात २५.७८ लाख मतदार २३९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT