राष्ट्रीय

भाऊ म्हणून सीएम जगन मोहन रेड्डींचा सीएम हेमंत सोरेन यांना सल्ला; पीएम मोदींचे हात बळकट करा!

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला. आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही हेमंत सोरेन यांना सल्ला दिला आहे. 

कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नव्हे! आरोग्यमंत्र्यांनी 'मन की बात' वरुन मुख्यमंत्र्यांना खडसावले

हेमंत सोरेन यांनी 'आज आदरणीय पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी फक्त त्यांची 'मन की बात' केली. जर ते कामाचं बोलले असते आणि कामचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं' असे ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा आधार घेत त्यांना टोला लगावला. यानंतर वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी यांनी या ट्विटरला उत्तर देत सोरेन यांना कोरोनाच्या महामारीत राजकारण न करण्याचा सल्ला दिला. 

तमिळनाडूत प्रत्येक कुटुंबाला ४ हजार कोरोना निधी 

त्यांनी 'प्रीय हेमंत सोरेन मला तुमच्याविषयी नितांत आदर आहे पण, एक भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपले कितीही मतभेद असले तरी अशा प्रकारचे राजकारण करण्याने फक्त देश दुबळा होईल.' असे पहिले ट्विट केले. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी हेमंत सोरेन यांना 'कोरोना विरुद्धच्या लढ्यात एकमेकांकडे बोट दाखवण्याची ही वेळ नाही तर एकत्र येऊन आपल्या पंतप्रधानांचे महामारीविरुद्ध लढण्यासाठी हात बळकट करण्याची गरज आहे.' असा सल्ला दिला. 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा!

काँग्रेसचेच एक बडे नेते आणि वडील वाएसआर रेड्डी यांच्या नावाने पक्ष स्थापन करणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांनी सध्या भाजपशी जवळीक साधली आहे. त्यामुळे त्यांनी सोरेन यांना सल्ला दिल्यानंतर लगेचच त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया आली. काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलका यांनी जगनमोहन यांच्यावर 'काँग्रेसच्या एका दिवंगत वरिष्ठ नेते वाय एस राजशेखर रेड्डींचा मुलगा धाडी पडतील या भितीने मोदींबरोबर डूडल डूडल खेळत आहेत. मोठे व्हा आता तुम्ही मुख्यमंत्री आहात.' अशी बोचरी टीका केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT