Jafarabadi Buffalo Sold at 5 lakh कोणत्याही जनावरांच्या बाजारात जास्त दुध देणाऱ्या जातीवंत म्हशींच्या किंमती १ लाखापासून २ ते अडीच लाखापर्यंत असतात. तर अगदी साध्या म्हशी एक लाखाच्या आतबाहेर खेळतात. पण तामिळनाडूच्या एका म्हशींने मात्र रेकॉर्ड केला असून, या म्हशीला तब्बल ५ लाखांची किंमत मिळाली आहे. या जाफराबादी म्हशीने एवढी किंमत मिळवून चांगलीच हवा केली आहे. सोशल मिडीयावर या म्हशीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कुठे झाला हा व्यवहार
तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील अंथियुर येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो, येथील प्रसिद्ध वार्षिक गुरुनाथस्वामी मंदिर उत्सवानिमित्त हा बाजार भरतो. या ठिकाणी आसपासच्या भागातून अनेक जनावरे विक्रीला येतात. यामध्ये दुर्ययी या मालकाने आपल्याकडील एक धिप्पाड म्हैस बाजारात फक्त प्रदर्शनासाठी आणली होती. तिची किंमत ५ लाख इतकी त्यांनी सांगितली होती. या त्यांच्या म्हशीकडे अनेकजण हौसेने पाहत होते. प्रत्येकजण तिच्याकडे थांबून बघते होते
आणि ५ लाखांला झाला सौदा
या म्हशीची किंमत ५ लाख असल्याने ती कोणी घेईल असे वाटत नव्हते. पण केरळमधील एक ग्राहकाला ही म्हैस पंसत पडली आणी त्याने ती विकत घेतली. या म्हशीचा व्यवहारा करताना ग्राहक घासघीस करेल असे वाटत होते पण दुर्ययी यांनी सागितली या ग्राहकाने ती सांगितलेल्या भावात खरेदी केली. यामुळे या म्हशीची फक्त तामिळनाडूच नाही तर या म्हशीची देशभरात चर्चा सुरू आहे. दिसायला अत्यंत धिप्पाड अशी हा म्हैस आहे. सोशल मीडियावर या म्हशीची जोरदार चर्चा आहे. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. पण ही म्हैस दूध किती देते. याची मात्र माहिती समजली नाही.
काय आहे जाफराबादी म्हशीचे वैशिष्ठ्ये
जाफराबादी ही मूळची गुजरातमधील गीर,सौराष्ट्र परिसराती म्हैस असून भारतातील सर्वात मोठी व वजनदार म्हशीची जात मानली जाते. मोठे फुगीर कपाळ आणि खाली झुकून कानांकडे वळलेली जाड शिंगे ही या जातीची ओळख असते. एका वेतामध्ये जाफराबादी म्हैस सरासरी २,२०० ते ३,००० लिटर दूध देते. म्हणजेच चांगल्या प्रतीची म्हैस दररोज १२ ते १८ लिटर दूध देते.या दुधात फॅटचे प्रमाण ७.५% ते ९.५% इतके जास्त असते, ज्यामुळे खवा, तूप आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी या दुधाला बाजारात चांगला दर मिळतो.
अवाढव्य आकार व भलीमोठी खाली वळलेली शिंगे
पूर्ण वाढ झालेल्या म्हशीचे वजन ६०० ते ७०० किलो, तर रेड्याचे वजन ८०० ते १,००० किलोपेक्षा जास्त भरू शकते याचे डोके मोठे, फुगीर कपाळ आणि कानांच्या बाजूने खाली झुकून पुन्हा किंचित वर वळलेली जाड, चपटी शिंगे असतात.