पुढारी ऑनलाईन डेस्क : वक्फ दुरुस्ती कायद्यावरून ( Waqf law ) आज (दि ७) जम्मू आणि काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्स वक्फ विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत आहे. एनसी नेते तन्वीर सादिक वक्फ कायद्याविरुद्ध स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली.
हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्यावर चर्चा करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. भाजपने प्रथम प्रश्नोत्तर सत्राची मागणी केली होती, तेव्हा नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी "वक्फ विधेयक स्वीकार्य नाही, ते परत घ्या" इत्यादी घोषणा दिल्या. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.