पुढारी ऑनलाईन डेस्क: Former CJI DY Chandrachud | भारताचे ५० वे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud) यांचा ८ नोव्हेंबरला न्यायालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार संजीव खन्ना यांनी ५१ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. निवृत्तीनंतर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रचूड म्हणाले, "सामान्य नागरिक म्हणून जगणं हे अधिक आनंददायी आहे".
निवृत्तीनंतरच्या आयुष्यावर माजी CJI धनंजय चंद्रचूड एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "न्यायालयीन कार्यालयातील बंधने आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेले असण्यापेक्षा सामान्य नागरिक म्हणून जगणं हे अधिक आनंददायी" असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना चंद्रचूड म्हणाले, धोरण बनवणे हे विधीमंडळाचे काम आहे. तर त्याची वैधता ठरवणे हे न्यायालयांचे काम आहे. न्यायाधिश नियुक्तीसाठीची कॉलेजियम प्रणालीबद्दल बरेच गैरसमज आहेत. ही प्रक्रिया अतिशय सूक्ष्म आणि बहुस्तरीय आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये न्यायपालिकेची विशेष भूमिका नाही".
न्यायालयिन प्रकरणे आणि सोशल मीडिया यावर देखील माजी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी न्यायालयीन प्रकरणांच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी विशेष स्वारस्य गटांकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे मत देखील माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे.