पुढारी ऑनलाईन डेस्क: Isro Spadex docking | अवकाशातील दोन उपग्रहांना जोडण्यासाठी होणाऱ्या इस्रोच्या स्पेस डॉकिंग प्रयोगाला (स्पेसएक्स) आता आणखी विलंब लागणार आहे. गुरूवारी ९ जानेवारी रोजी होणारी स्पाडेक्स 'डॉकिंग' चाचणी तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. इस्रोने स्पेसएक्स डॉकिंग चाचणी पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. या संदर्भातील अपडेट इस्रोने गुरूवारी (दि.९) रात्री त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स (X) अकाऊंटवरून दिली आहे.
इस्रोची पहिली स्पेस डॉकिंग चाचणी आता आणखी लांबणीवर पडणार आहे. गुरूवारी (दि.१०) होणारा स्पाडेक्स 'डॉकिंग' चा एकत्रित प्रयत्न पुढे ढकलण्यात आला आहे, ही माहिती इस्रोने काल रात्रीच दिली. स्पेसएक्स मिशनच्या चेसर आणि लक्ष्य उपग्रहांमधील अंतर ५०० मीटरवरून २२५ मीटरपर्यंत कमी करण्यासाठी काल रात्री दिलेल्या सूचनांदरम्यान तांत्रिक समस्या उद्भवली. ज्या वेगाने उपग्रह एकमेकांच्या जवळ येत आहेत तो वेग निर्धारित वेगापेक्षा जास्त झाला त्यामुळेच डॉकिंग समस्या थांबवण्यात आली. अंतराळयानाचा वेग आणि दिशा नियंत्रित करणारे थ्रस्टर्स काही काळानंतर काम करणे थांबवतात, हेच या समस्येचे कारण असल्याचे इस्रोने म्हटले आहे. हे का घडले याचा तपास इस्रो करत आहे.
भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर २२ मिनिटांनी टास्मानियाहून मिळालेल्या प्रतिमेनुसार, स्पेसएक्स उपग्रहांमधील अंतर आता सुमारे पाच किलोमीटर आहे. डॉकिंग चाचणीची पुढील तारीख इस्रोने अद्याप जाहीर केलेली नाही. यापूर्वी इस्रोने ७ जानेवारी रोजी डॉकिंग चाचणी घेण्याची योजना आखली होती. तांत्रिक कारणांमुळे ते ९ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते, परंतु गुरूवारी रात्री इस्रोला ते पुन्हा पुढे ढकलावे लागले.