राष्ट्रीय

गेमिंगद्वारे मुलांचे धर्मांतरण प्रकरणाची चौकशी करा

backup backup

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतरण केले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे खणून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एनसीपीसीआर अध्यक्षा प्रियांका कानूनगो यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

ऑनलाईन गेमिंग तसेच सोशल मीडीयाच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतरण केले जात असल्याची धक्कादायक बाब अलिकडेच उघडकीस आली होती. गाझियाबादमधील एक मुलगा पाचवेळा मशिदीत नमाजासाठी जात असल्याचा प्रकार त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणाचे सूत्रधार महाराष्ट्रात असल्याचेही चौकशीत समोर आले होते. गेम खेळत असतानाच मुलांचे ब—ेनवॉश करायचे व त्यांना धर्मांतरण करण्यास भाग पाडायचे, अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने या प्रकरणाची लवकरात लवकर पाळेमुळे खणून काढावीत, असे प्रियांका कानूनगो यांनी सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT