केजरीवाल यांच्या 'शीश महल'चा Video आला समोर, लक्‍झरी '7 स्‍टार' पेक्षा कमी नाही थाट File Photo
राष्ट्रीय

केजरीवाल यांच्या 'शीश महल'चा Video आला समोर, लक्‍झरी '7 स्‍टार' पेक्षा कमी नाही थाट

दिल्‍ली भाजप अध्यक्षांकडून केजरीवालांवर टीका

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

केजरीवाल यांच्या ज्‍या 'शीशमहल' ची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे त्‍याचा अंतर्गत रचनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दिल्‍लीचे भाजप अध्यक्ष वीरेन्द्र सचदेवा यांनी एक व्हिडिओ शेअर करत हा एक सेवन स्‍टार बंगला असल्‍याचे म्‍हटले आहे. हा तोच बंगला आहे ज्‍या ठिकाणी दिल्‍लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राहत होते.

वीरेंद्र सचदेवा यांनी आपल्‍या सोशल मीडिया हँडल x वरून हा व्हिडिओ पोस्‍ट करत लिहिलंय की, स्‍वत: ला आम आदमी म्‍हणणारे अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टतेच्या शीशमहलबद्दल आम्ही सत्य सांगत आलो आहोत. आज तुम्‍हाला दाखवणारही आहे. जनतेचे पैसे खाउन आपल्‍यासाठी 7-Star Resort चा निर्मिती केली आहे. लहान मुलांची शपथ घेणारे, सरकारी घरे, वाहने, सुरक्षा न घेण्याचे खोटे आश्वासन देणारे दिल्लीतील करदात्यांचे उत्पन्न कसे लुटत आहेत.

खुर्ची मिळाल्यावर केजरीवालही इतरांसारखे झाले

केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावर भाजपने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. भाजप म्‍हणते की, हे तेच केजरीवाल आहेत, ज्‍यांना ४ ते ५ पेक्षा अधिक खोल्‍यांची गरज नाही असे म्‍हणत होते. व्हिआयपी कल्‍चरवर नेहमी टीका करायचे. मात्र ऑपरेशन शीशमहलने हे दाखवून दिले की, जेंव्हा त्‍यांना खुर्ची मिळाली तेंव्हा ते इतरांसारखेच बनले. अनेक प्रकरणात तर इतरांनाही त्‍यांनी मागे सोडलेय.

व्हिडीओने त्यांचा पर्दाफाश केला आहे!

या व्हिडिओमध्ये दिसते की, केजरीवाल यांचे निवास हे कोणत्‍याही सामान्य व्यक्‍तीच्या घरासारखे नक्‍कीच नाही. तर ते एखाद्या ७ स्‍टार हॉटेलप्रमाणे सर्व सुविधांनी सुसज्‍ज आहे. ऑपरेशन शीशमहल पहिल्‍यांदाच सांगण्यात आले होते की, केजरीवाल यांच्या नव्या 'महाल' मध्ये ८ लाख रूपयांचे पडदे लावण्यात आले आहेत. ४ लाख रूपयांचे कमोड आहे. कोट्यवधी रूपयांचे मार्बल लावण्यात आले आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री निवासच्या नुतनीकरणच्या नावाखाली ४५ कोटी रूपयांच्या खर्चाशी निगडीत आहे. आतापर्यंत सर्वकाही डॉक्‍यूमेंटव्दारे दाखवण्यात आले आहे. पहिल्‍यांदाच नव्या मुख्यमंत्री निवासाच्या अंतर्गत रचनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT