राष्ट्रीय

Interest Rates Rise : व्याज दरामध्ये आणखी अर्धा टक्का वाढ होणार, ‘एसबीआय’चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) डिसेंबर महिन्यात कर्ज व्याज दरात आणखी अर्धा टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष सी. एस. शेट्टी म्हणाले. त्यामुळे कर्ज मागणीत घट होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

मुंबईत आयोजित बीएफएसआय इनसाईट समिटमध्ये ते म्हणाले, व्याज दरांचा परिणाम कर्जाच्या मागणीच्या स्वरूपावर आणि प्रमाणावर नक्कीच होईल. हा परिणाम लगेच दिसून येईलच असे नाही. जसजसा काळ पुढे जाईल, तसतसा हा परिणाम स्पष्ट होत जाईल. डिसेंबरमध्ये पुन्हा व्याज दर वाढले, तर व्याज दरांशी संवेदनशील असलेल्या ऐच्छिक कर्ज क्षेत्रांवर (वाहन, तारण, वैयक्तिक कर्ज) काही प्रमाणात घट दिसून येऊ शकते.

उत्पादक कर्ज मागणी कायम

येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, आपण अशा एका टप्प्यात प्रवेश करत आहोत जिथे व्याज दर वाढत आहेत. परंतु त्याच वेळी कर्जाची वाढही भक्कम आहे. एका बाजूला व्याज दर वाढत आहेत; तर दुसरीकडे ७.१ टक्के आर्थिक वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेकडून कर्जाची मागणी कायम राहील, ज्यामुळे कर्जाच्या वाढीचा वेगही टिकून राहील, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT