Instagram love affair file photo
राष्ट्रीय

Instagram love affair: इन्स्टावरून ४० वर्षीय विधवेच्या प्रेमात पडला २१ वर्षांचा तरुण; घर सोडून पळाला अन् मग जे घडलं...

इंस्टाग्रामवर झालेली मैत्री एका २१ वर्षीय तरूणाच्या कुटुंबासमोर मोठी समस्या बनली आहे.

मोहन कारंडे

Instagram love affair

उत्तर प्रदेश : इंस्टाग्रामवर झालेली मैत्री एका २१ वर्षीय तरूणाच्या कुटुंबासमोर मोठी समस्या बनली आहे. अमरोहा येथील एक तरुण अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता, त्याचा शोध घेत त्याची आई आग्रा येथे पोहोचली. ट्रान्स यमुना भागात एका ४० वर्षीय विधवा महिलेच्या घरी मुलगा सापडल्यानंतर ती हादरली.

इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

अमरोहा येथील रहिवासी असलेल्या या तरुणाची इंस्टाग्रामवर आग्रा येथील ट्रान्स यमुना परिसरात एकट्या राहणाऱ्या एका विधवा महिलेशी मैत्री झाली होती. वयात सुमारे १९ वर्षांचे अंतर असूनही दोघांमध्ये जवळीक वाढली. हा तरुण अनेक दिवसांपासून महिलेच्या घरीच राहत होता. घरातून गायब झाल्याने त्याचे कुटुंबीय काळजीत पडले.

आईने भाजप नेत्यांच्या मदतीने लावला पत्ता

तरुणाची आई भाजपशी संबंधित आहे. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे त्यांनी पोलिसांसोबतच स्थानिक भाजप नेत्यांकडेही मदत मागितली. नेत्यांच्या मदतीने महिलेच्या घराचा पत्ता लागला. त्यानंतर आई थेट आग्रा येथे महिलेच्या घरी पोहचली.

घरी पोहोचताच गोंधळ, मुलाचा पळण्याचा प्रयत्न

आईला पाहताच तरुण घाबरला आणि त्याने घरातून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बाहेर मोठा गदारोळ झाला. आरडाओरडा ऐकून शेजारी आणि स्थानिक लोक जमा झाले. लोकांनी त्या महिलेची समजूत घातली की, वयातील मोठ्या अंतरामुळे हे नाते योग्य नाही. एका स्थानिक नेत्यानेही महिलेशी चर्चा केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. एसीपी छत्ता शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, दोन्ही दोघेही सज्ञान आहेत, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. पोलीस केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होते. आपापसातील चर्चा आणि तडजोडीनंतर हा वाद शांत झाला. शेवटी तरुण आपल्या आईसोबत अमरोहाला परत गेला. महिलेनेही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि हे प्रकरण निवळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT