Infosys fires 240 trainees X
राष्ट्रीय

तुम्ही पात्र नाही! इन्फोसिसने 240 प्रशिक्षणार्थ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Infosys fires 240 trainees: तरूणांचा स्वप्नभंग; कंपनीच्या ईमेलची सोशल मीडियात जोरदार चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने त्यांच्या अंतर्गत प्रशिक्षण चाचणीत अपयशी ठरलेल्या 240 प्रशिक्षणार्थ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनीने याबाबत आज प्रशिक्षणार्थ्यांना ईमेलद्वारे कळवले असून, यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात 300 हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना कामातून काढण्यात आले होते.

दरम्यान, कंपनीच्या ईमेलवरून सोशल मीडियात नेटीझन्समध्ये चांगलेच चार्चासत्र रंगल्याचे दिसून येत आहे. त्यावर अनेकजण व्यक्त होत आहेत. (Infosys fires 240 trainees)

ई-मेल मध्ये काय म्हटले आहे?

कंपनीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “तुम्हाला अतिरिक्त तयारीचा वेळ, शंका निरसन सत्रे, अनेक मॉक टेस्ट आणि तीन संधी दिल्या असूनही तुम्ही 'जनरिक फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्रॅम' मधील पात्रता निकष पूर्ण करू शकला नाही.

त्यामुळे, तुम्ही आता 'अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम' चा भाग राहू शकणार नाही, असे 18 एप्रिल रोजी पाठवलेल्या नोकरी संपुष्टात आणणाऱ्या ईमेलमध्ये कंपनीने नमूद केले आहे.

प्रशिक्षणार्थ्यांसाठी इन्फोसिसकडून आधार

सेवा समाप्त करत असतानाही कंपनीने काही सहायक योजना जाहीर केल्या आहेत-

  • एक महिन्याचा पगार एक्स-ग्रेसिया स्वरूपात

  • रिलीव्हिंग लेटर व इतर दस्तऐवज

  • करिअर मार्गदर्शन व नोकरी शोध सेवा (Outplacement), कौशल्यविकास कार्यक्रम (Upskilling)

  • 12 आठवड्यांचा बीपीएम क्षेत्रासाठी प्रशिक्षण

  • 24 आठवड्यांचा आयटी फंडामेंटल्स प्रशिक्षण तसेच प्रवास व निवास सोयीमध्ये म्हैसूरहून बंगळुरूसाठी प्रवासाची व्यवस्था

  • मूळ गावी जाण्यासाठी प्रवास भत्ता

  • म्हैसूर येथील एम्प्लॉयी केअर सेंटरमध्ये निवास तर काउंसिलिंग सेवेत मानसिक आधारासाठी सल्लागार उपलब्ध केला आहे.

दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले प्रशिक्षणार्थी

यापैकी अनेक प्रशिक्षणार्थी गेल्या दोन वर्षांपासून नोकरीसाठी प्रतीक्षेत होते. सध्या सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे आयटी कंपन्यांवर प्रकल्प खर्च कमी करण्याचा दबाव आहे. कंपनीकडून पुढील बॅचच्या निकालांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

कंपनीने सुचविलले पर्याय

कंपनीने प्रशिक्षणार्थींना NIIT आणि UpGrad सह भागीदारी करून मोफत अपस्किलिंग कार्यक्रम ऑफर केले आहेत. यात फेब्रुवारीमध्ये काढून टाकलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचाही सहभागी करून घेतले आहे.

कंपनीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की हे कार्यक्रम BPM उद्योगात तयारी करण्यासाठी किंवा तुमच्या IT कौशल्यांची रचना कायम ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

प्रशिक्षणाची यशस्वी पूर्तता केल्यावर, तुम्ही इन्फोसिस BPM लिमिटेडमधील उपलब्ध संधींसाठीदेखील अर्ज करू शकता. तथापि, जर IT कौशल्यांवर आणखी काम करायचे असेल, तर इन्फोसिस प्रायोजित बाह्य प्रशिक्षण कार्यक्रम निवडण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT