Inflation Rate Rises | महागाई निर्देशांकात वाढ; ४.३८ टक्क्यांवर Pudhari News Network
राष्ट्रीय

Inflation Rate Rises | महागाई निर्देशांकात वाढ; ४.३८ टक्क्यांवर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : खाद्यान्‍नाच्या दरात वाढ झाल्याने मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) ३.९३ वरून ४.३८ टक्क्यांवर गेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) चार ते सहा या न्यूनतम आणि महत्तम पातळीच्या कक्षेत महागाई निर्देशांक आहे.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक खाद्यान्‍न किंमत निर्देशांक जूनमध्ये ४.७८ वरून ५.३२ टक्क्यांवर गेला आहे. ग्रामीण भागातील किरकोळ महागाई निर्देशांक ४.७४ आणि शहरी भागातील निर्देशांक ३.९२ टक्के होता. ग्रामीण भागातील खाद्यान्‍नाचा महागाई निर्देशांक ५.४५ आणि शहरी भागातील निर्देशांक ५.०९ टक्क्यांवर गेला आहे. घरगुती महागाई निर्देशांक २.१० टक्के असून शहराचा १.९० आणि ग्रामीण भागाचा २.६६ टक्के आहे.

संपूर्ण आखातावर युद्धाचे ढग

वॉशिंग्टन/तेहरान/दुबई : अमेरिकेने इराणवर केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌ने सोमवारी सकाळी बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. याशिवाय ओमानमधील रडार यंत्रणा आणि जॉर्डनमधील प्रिन्स हसन हवाईतळावरील इंधनाचे टँक तसेच दारूगोळा डेपोवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ले करण्यात आले. या आक्रमणामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून जागतिक तेलपुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT