प्रातिनिधिक फोटो. File Photo.
राष्ट्रीय

emergency landing | मोठी दुर्घटना टळली! इंजिन निकामी झाल्याने इंडिगो विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

IndiGo flight emergency landing | लँडिंगच्या काही वेळ आधी विमानात तांत्रिक बिघाड

पुढारी वृत्तसेवा

IndiGo flight emergency landing

नवी दिल्ली : येथील विमानतळावर आज (दि. २८) सकाळी १६१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंजिन निकामी झाल्यामुळे विमानतळ प्रशासनाने तातडीने 'पूर्ण आणीबाणी' घोषित केली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणत्याही नुकसानीची नोंद झालेली नाही.

लँडिंगच्या काही वेळ आधी विमानात तांत्रिक बिघाड

६E ५७९ हे बोईंग ७३७ विमान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून दिल्लीला येत होते. हे विमान इंडिगोने तुर्कीच्या 'कोरेन्डन एअरलाईन्स'कडून 'वेट-लीज'वर घेतले होते. इंडिगोकडे कोरेन्डन एअरलाईन्सची अशी पाच विमाने असून ती तात्पुरत्या तत्त्वावर चालवली जातात. इंडिगोने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, लँडिंगच्या काही वेळ आधी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकांनी प्राधान्याने लँडिंग करण्याची विनंती केली. त्यानुसार विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढले

अग्निशमन दलाला सकाळी १०:५४ वाजता या आपत्कालीन लँडिंगबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना केल्या. सर्व संबंधित यंत्रणांना त्वरित कळवण्यात आले आहे सध्या विमानाची आवश्यक तपासणी आणि देखभाल केली जात आहे. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच इंडिगोसाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT