IndiGo ऑनलाईन बुकींग सिस्टम मंदावली, प्रवासी हैराण File Photo
राष्ट्रीय

IndiGo ची यंत्रणा डाऊन, प्रवाशांना फटका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: इंडिगो एअरलाईन्स कंपनीची बुकिंग प्रणाली आज (दि.५) अचानपणे तात्पुरती मंदावली. याचा परिणाम वेबसाइट आणि बुकिंग सिस्टमवर परिणाम होत आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून इंटरनेट नेटवर्क सेवा स्लोडाऊन झाल्याने याचा ऑनलाईन बुकींग करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याची माहिती स्वत: IndiGo कंपनीने दिली आहे.

इंडिगो एअरलाइन्सबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीच्या बुकिंग सिस्टममध्ये झालेल्या बिघाडामुळे फ्लाइट ऑपरेशनवर परिणाम झाला आहे. सुमारे एक तासानंतर दुपारी 1.05 च्या सुमारास कामकाज सुरळीत सुरू होऊ शकले. मात्र, इंडिगो बुकिंग सिस्टीम अजूनही डाऊन युजर्संना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती कंपनीने स्वत: दिली.

प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल कंपणीने व्यक्त केली दिलगिरी

या समस्येवर IndiGo कंपनीने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही सध्या आमच्या नेटवर्कवर तात्पुरता सिस्टम स्लोडाउन अनुभवत आहोत, त्यामुळे आमच्या वेबसाइट आणि बुकिंग सिस्टमवर परिणाम होत आहे. परिणामी, ग्राहकांना हळुवार चेक-इन आणि विमानतळावरील लांब रांगांसह प्रतीक्षा वेळा वाढू शकतात. आमची विमानतळ टीम उपलब्ध आहे आणि सर्वांना मदत करण्यासाठी आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. खात्री बाळगा, आम्ही शक्य तितक्या लवकर स्थिरता आणि सामान्यता पुनर्संचयित करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहोत. आम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. यावेळी तुमच्या समजूतदारपणाची आणि संयमाची प्रशंसा करत असल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT