पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक गोपीचंद थोटाकुरा यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड-25 (NS-25) मिशनसाठी क्रूचा एक भाग म्हणून त्यांनी अंतराळात प्रवास केला होता, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
या प्रसंगी अंतराळ पर्यटक गोपीचंद यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, " बऱ्याच काळापासून या अनुभूतीची वाट पाहिली जात आहे. मायदेशी परतताना मला खूप आनंद झाला आहे. भारतासाठीही हा खूप अभिमानाचा क्षण आहे. देशाचे प्रतिनिधीत्व केल्याचा मला सन्मान वाटतो."