राष्ट्रीय

Indian medical association चे पंतप्रधानांना पत्र रामदेव बाबांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन ; Indian medical association ने पंतप्रधान नरेंद मोदींना पत्र लिहत बाबा रामदेव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या महामारीबाबत सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि लसीकरणाबाबत चुकीची माहिती पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी Indian medical association केली आहे. मागच्या काही दिवसांपासून Indian medical association आणि बाबा रामदेव यांच्यात वाद सुरू आहे.

अधिक वाचा : बारावीच्या 19 हजारांवर विद्यार्थ्यांना निर्णयाची प्रतीक्षा

उत्तराखंडमधील Indian medical association कडून एक हजार कोटींची मानहानीची नोटीस पाठविली आहे. दरम्यान, बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी या वादाला नवे वळण दिले आहे. ते म्हणाले, काही लोकांना योग आणि आयुर्वेदाची बदनामी करायची आहे. संपूर्ण देश ख्रिश्चन बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अधिक वाचा : कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक: उच्चांकी २५९९ रुग्ण वाढल्याने प्रशासन हादरले

आचार्य बालकृष्णाने पुढे म्हणाले की, संपूर्ण देश ख्रिश्चन धर्मात वर्ग करण्याच्या कट काही जणांचा आहे. याचाच एक भाग म्हणून बाबा रामदेव यांच्यावर निशाणा साधत योग आणि आयुर्वेदाची बदनामी केली जात आहे. देशवासीयांनो, जर तुम्ही झोपेतून जागे झाला नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयलाल यांचे एक व्यक्तव्य पोस्ट आचार्य बाळकृष्ण यांनी सोशल मीडियावर केली आहे. त्यामध्ये डॉक्टर जयलाल हे रुग्णालये आणि शाळांमध्ये ख्रिश्चन धर्माची जाहिरात करतात.

अधिक वाचा : सरकार टिकवायची जबाबदारी केवळ शिवसेनेची नाही: मुख्यमंत्री- शरद पवार यांची भेट  

योगगुरु रामदेवबाबांचा एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला होता. यामध्‍ये कोरोना रुग्‍णांच्‍या मृत्‍यूला ॲलोपॅथी उपचार पद्‍धती व डॉक्‍टर जबाबदार असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला होता. याविरोधात ॲलोपॅथी डॉक्‍टरांनी आक्रमक पवित्रा घेत त्‍यांच्‍याविरोधात कारवाईची मागणी केली होती. केंद्रीय आरोग्‍य मंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबांनी तत्‍काळ विधान मागे घ्‍यावे, अशी मागणी केली होती. 

अधिक वाचा : एव्हरेस्टवर वेगवान वारे, स्नो फॉल सुरूच

योगगुरु रामदेव बाबा यांच्‍यावर ठोस कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी डॉ. खन्‍ना यांनी उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री आणि मुख्‍य सचिव यांच्‍याकडे पत्राव्‍दारे केली होती. दरम्‍यान, ॲलोपॅथीबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त विधान रामदेवबाबांनी मागे घेतले होते. मात्र यानंतर त्‍यांनी आयएमएला २५ प्रश्‍न विचारले होते. या प्रश्‍नांचे पत्रक सोशल मीडियावर शेअरही केले होते. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT