leave-reaction-viral-post: एका कर्मचाऱ्याने आपल्या जपानी आणि भारतीय बॉसकडून मिळालेल्या सुट्टीसंदर्भातील दोन भिन्न प्रतिसाद शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर कार्यसंस्कृतीविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.
सुट्टीबाबत दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया रेडिट यूजरनुसार, काही तातडीच्या कामासाठी मूळगावी जाण्यासाठी रजा मागितली होती. त्यांच्याकडे अजून सात कॅज्युअल लीव्ह शिल्लक होत्या. दोन्ही बॉसनी सुट्टी मंजूर केली, मात्र दोघांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. 'डिफरन्स बिटविन अ जपनीज मॅनेजर अॅण्ड अन (अँड अ) इंडियन मॅनेजर' या या शीर्षकाखाली रेडिटवर पोस्ट करण्यात आलेल्या या मजकुरात दोन स्क्रीनशॉट्स दाखवण्यात आले आहेत. या माध्यमातून (माध्यमातून) दोन्ही देशांतील व्यवस्थापन पद्धतीतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. कर्मचाऱ्याने (कर्मचाऱ्याने) केलेल्या (केलेल्या) रजेबाबत दोन प्रतिसाद मिळाले, जपानी मॅनेजरने लिहिलं की, "शुभ दिवस! नोंद घेतली आहे. कृपया घरी जाताना काळजी घ्या." तर भारतीय व्यवस्थापकाचा संक्षिप्त असा होता: "मंजूर. कृपया टीम्स आणि मेलवर ऑनलाईन राहा."
ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. अनेकांनी आपल्या कामाच्या ठिकाणचे अनुभव शेअर केले. एका युजरने पोस्ट (पोस्ट) केली की, “हो खरंच! मी जपानी क्लायंट्ससोबत काम केलं आहे. ते इतके नम्र आणि सभ्य असतात. भारतीय क्लायंट्ससोबत काम करताना हा फरक स्पष्ट जाणवतो.” तर एकाने म्हटलं (म्हटलं) की, “मी भारतीय असून आता फ्रान्समध्ये काम करतो. इथे जीवनाला (जीवनाला) कामापेक्षा प्राधान्य दिलं जातं, पण भारतात कामाला जीवनापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं.” व्यवस्थापनशैली आणि सहानुभूती दृष्टिकोनावर (दृष्टिकोनावर) अनेकांनी मत व्यक्त केलं की, सुट्टीच्या विनंतीला दिलेला एक साधा, मनापासून प्रतिसादही कर्मचाऱ्यांना आदर आणि महत्त्व मिळाल्याची जाणीव करून देतो, यावर युजर्स चर्चा करत आहेत.